तरुण भारत

कॅम्प येथे वृक्षांची तोड, पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी

प्रतिनिधी /बेळगाव

शहराचा विकास करण्याच्या नावाखाली शहर भकास करण्याचा प्रयत्न मागील काही दिवसांपासून सुरू आहे. कॅम्प येथे चिकू वाटिकेच्या शेजारी अनेक जुनाट वृक्षांची तोड करण्यात आली. गरज नसतानाही वृक्षांची तोड केली जात असल्याने पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त करण्यात आली. स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरातील अनेक वृक्षांची यापूर्वी तोड करण्यात आली आहे. नागरिकांनी विरोध करूनही वृक्ष तोडण्यात आले. आता स्मार्ट सिटीसोबतच कॅन्टोन्मेंट बोर्डने वृक्षतोड करण्यास सुरूवात केली आहे. मिलिटरी महादेव मंदिरामागील बाजूस असणाऱया चिकू बागेशेजारी वृक्षांची शुक्रवारी तोड करण्यात आली. यामुळे पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisements

Related Stories

अखेर एसएसएलसी परीक्षेला मुहूर्त

Patil_p

अपहरण प्रकरणी आणखी एकाला अटक

Rohan_P

बसस्थानकातील प्रवेशद्वार खुले

Amit Kulkarni

‘ई-जन्म’च्या माध्यमातून मृत व्यक्तीचे आधारकार्ड होणार रद्द

Amit Kulkarni

बारावी रिपीटर विद्यार्थी पास…

Rohan_P

तालुक्यात विकेंड कर्फ्यू जारी

Patil_p
error: Content is protected !!