तरुण भारत

कराडच्या रूक्मिणीनगर येथे महिलेचा खून

प्रतिनिधी / कराड :

गेल्या दीड महिन्यात कराड शहर परिसरात खुनांची मालिका सुरू असून, कराडच्या रूक्मिणीनगर परिसरात ३४ वर्षीय महिलेेचा खून झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या घटनेने खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Advertisements

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार रूक्मिणीनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या ठाणेकर कुटूंबातील महिलेचा निर्घृण खून झाल्याचे शनिवारी उघडकीला आले. शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा असल्याने पोलीस बंदोबस्तात असतानाच सकाळी रूक्मिणीनगर येथे खून झाल्याची घटना समोर आली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांच्यासह पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या महिलेच्या खुनाच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे काम सुरू होते. दरम्यान खुनाच्या घटनेने रूक्मिणीनगर परिसर पुन्हा एकदा हादरून गेला.

Related Stories

बडय़ा धेंढय़ांना पालिकेचे अभय

Patil_p

सातारा विकास आघाडीतच रणकंदन

Patil_p

राजवाडा बसस्थानकातील इतिहास विद्रुपीकरण थांबवा

Patil_p

जेईई, नीट परिक्षेत छ. शाहू ऍकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे यश

Patil_p

मराठा पॅलेसमध्ये जुगार; अकराजणांवर गुन्हा दाखल

Patil_p

न्यायालयात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक; महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्षास अटक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!