तरुण भारत

प्रख्यात स्त्रीवादी लेखिका कमला भसीन यांचे निधन

ऑनलाईन टीम / मुंबई :

प्रख्यात स्त्रीवादी लेखिका आणि महिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे आज पहाटे तीनच्या सुमारास निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या.

Advertisements

स्त्रीवादी कार्यकर्ती, कवयित्री, लेखिका अशी त्यांची ओळख असलेल्या कमला भसीन यांचा जन्म 24 एप्रिल 1946 रोजी झाला होता. महिला हक्क चळवळीच्या लढय़ात दक्षिण आशियातील स्त्रीवादी आंदोलनाला पुढे नेण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. काही महिन्यांपूर्वीच त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते.

कमला यांनी 2002 मध्ये त्यांनी स्त्रीवादी नेटवर्क ‘संगत’ ची स्थापना केली. याद्वारे त्यांनी ग्रामीण, आदीवासी समाजातील वंचित स्त्राrयांच्या हक्कांसाठी लढा दिला. भसीन यांनी लिंग सिद्धांत, स्त्रीवाद आणि पितृसत्ता यावर अनेक पुस्तके लिहिली आहेत.

Related Stories

नवीन नकाशाबाबत नेपाळ संसदेच्या वरिष्ठ सभागृहात आज मतदान

datta jadhav

रत्नागिरीत कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ, आज नवे चार रुग्ण

triratna

आयोडीनच्या सौम्य द्रावणाने कोरोना विषाणूचा नाश; शास्त्रज्ञांचा दावा

datta jadhav

देशमुखांचं उठसूठ समर्थन करणाऱ्या ठाकरे सरकारचंही तोंड काळं झालंय ; हायकोर्टाच्या निर्णयानंतर भाजपची टीका

triratna

मराठा आरक्षण : घटनापीठाचा निर्णय लवकरच

triratna

कोल्हापूर जिल्ह्यात दुध,औषध, वृत्तपत्र भाजीपाला, गॅस वगळता सर्वच बंद

triratna
error: Content is protected !!