तरुण भारत

गुटखा खाऊन सरकारमध्ये बसलेल्या मराठा मंत्र्यांनी समाजासाठी बोलावे – नरेंद्र पाटील

प्रतिनिधी / सांगली

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला व्याज प्रतिपूर्तीसाठी आवश्यक निधी मिळत नसताना पान-गुटखा खाऊन सरकारात असलेल्या मराठा मंत्र्यांनी समाजासाठी बोलावे असे संतप्त आव्हान अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना केले.

नरेंद्र पाटील म्हणाले, मराठा समाजाबद्दल महाविकास आघाडी सरकारला किती आस्था आहे हे दाखवून दिले आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला सन 2021-22 साठी केवळ 12 कोटी 50 लाख रुपये इतकाच निधी वर्ग करण्यात येईल असा निर्णय एक सप्टेंबर रोजी सरकारने घेतला आहे.

राज्यातील 30हजार मराठा बांधवांनी कर्ज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेचा लाभ घेतलेला आहे. दोनशे कोटींचे कर्ज वाटप राष्ट्रीयीकृत, सहकारी बँका, एनबीएफसीने यासाठी दिलेले आहे. मराठा बांधवांना व्यवसायात मदती करीता हप्ता फेडल्यानंतर व्याज परतावा दिला जातो. दर महिन्याला साधारण आठ कोटींची व्याज प्रतिपूर्ती करावी लागते. दर महिन्याला आठ कोटींचे व्याज परतावा द्यायचा असेल तर वर्षाकरिता कमीत कमी 96 कोटी रुपये तरी महामंडळाकडे असणे गरजेचे आहे. परंतु दुर्भाग्याने महाविकास आघाडीच्या माध्यमातून फक्त साडेबारा कोटी रुपये निधी वर्षभरासाठी दिलेला आहे.

नरेंद्र पाटील पुढे म्हणाले, सरकारच्या या कृतीचे मराठा बांधवांनी परत एकदा आत्मचिंतन केले पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचे सरकार आहे म्हणणारी मंडळी तोंडामध्ये पान गुटखा घेऊन सरकारात बसलेली आहेत. मराठा समाजाबद्दल मंत्री गप्प बसलेले आहेत. आपण त्यांना विनंती करतो की, कृपा करून आपण परत एकदा याची चर्चा करा. महामंडळाला दिलेल्या आणि गरजेच्या रकमेची माहिती घ्या आणि ताबडतोब कमीत कमी दीडशे ते दोनशे कोटी महामंडळाला वर्ग करा असे आवाहनही नरेंद्र पाटील यांनी केले आहे.

Related Stories

कोरोनाची धास्ती : नागपुरात लागू असलेले निर्बंध 14 मार्चपर्यंत कायम

Rohan_P

केंद्र सरकारच्या ‘आरोग्य सेतू’ वर राहुल गांधी यांच्याकडून प्रश्नचिन्ह

Rohan_P

पूनम पांडे, मरीन ड्राइव पोलिसांच्या ताब्यात

Rohan_P

पूरग्रस्तांना २०१९ च्या निकषानुसार मदत

Abhijeet Shinde

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, पणनमंत्र्यांचे आदेश

Abhijeet Shinde

बेवारस वाहनांच्या विरोधात दुसऱ्या दिवशीही कारवाई

Abhijeet Shinde
error: Content is protected !!