तरुण भारत

राशिभविष्य

रवि. दि. 26 सप्टें. ते 2 ऑक्टो. 2021

मेष

Advertisements

या सप्ताहात कन्येत बुध वक्री, वृश्चिक शुक्र प्रवेश होत आहे. धंद्यात कायदा पाळण्यास विसरू नका. कोणताही वाद वाढवू नका. आर्थिक व्यवहारात सावध रहा. मोह जास्त न ठेवता कामे करा. नोकरी टिकवा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या मनाप्रमाणे कामे होतील असे समजू नका. दादागिरी करू नका. कुणावरही विश्वास ठेवताना काळजी घ्या. संसारात समस्या येईल.

वृषभ

या सप्ताहात कन्येत बुध वक्री, वृश्चिकेत शुक्र प्रवेश होत आहे. महत्त्वाची सर्व कामे या सप्ताहात करून घ्या. धंद्यात वाढ होईल. नवे काम मिळेल. थकबाकी वसूल करा. कर्जाचे काम करून घ्या. नोकरीत प्रगती होईल. राजकीय, सामाजिक कार्यात वेगाने कामे पूर्ण करा. जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करा. नवीन ओळख होईल. संसारात चांगली घटना घडेल.

मिथुन

या सप्ताहात कन्येत बुध वक्री, वृश्चिकेत शुक्र प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला अडचणी येतील. प्रवासात सावध रहा. वादविवाद वाढवू नका. कायदा पाळा. धंद्यात समतोल वृत्तीने वागा. नोकरीत कामे वाढतील. राजकीय, सामाजिक कार्यात विरोधक समस्या निर्माण करतील. मैत्रीत गैरसमज होईल. खर्च वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या.

कर्क

या सप्ताहात कन्येत बुध वक्री, वृश्चिकेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात जम बसेल. नवे काम मिळेल. ओळखी वाढतील. थकबाकी वसूल करा. नोकरीत प्रगती होईल. राजकीय-सामाजिक कार्यातील तणाव कमी करून वेगाने पुढे जाता येईल. प्रतिष्ठा वाढेल. संसारात चांगली घटना घडेल. प्रेमाला चालना मिळेल. कला-क्रीडा- साहित्यात चमकाल. कठीण प्रश्न सोडवा.

सिंह

या सप्ताहात कन्येत बुध वक्री, वृश्चिकेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात वाढ करण्याची संधी मिळेल. मोहाला बळी पडू नका. नोकरीत कायद्यानुसार कामे करा. संसारात क्षुल्लक तणाव होईल. अनाठायी खर्च टाळा. राजकीय, सामाजिक  कार्यात प्रतिष्ठा टिकवून ठेवता येईल. योग्य सल्ल्याची गरज जाणून घ्या. दिशाभूल होईल. विरोधक मैत्रीसाठी पुढे येतील.

कन्या

या सप्ताहात तुमच्या राशीत बुध वक्री, वृश्चिकेत शुक्र प्रवेश होत आहे. धंद्यात जम बसेल. नवे मोठे कंत्राट मिळवता येईल. मैत्री वाढेल. शेअर्समध्ये फायदा होईल. शेतकरी वर्गाला नवी दिशा मिळेल. नोकरीत प्रगती कराल. राजकीय, सामाजिक कार्याला वेगाने पुढे न्या. वेळेला महत्त्व द्या. खंबीरपणाला योग्य वळण द्या. दादागिरी नको. संसारात सुखद समाचार मिळेल.

तुळ

या सप्ताहात कन्येत बुध वक्री, वृश्चिकेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात अडचणी येतील. दादागिरीची भाषा चालणार नाही. काही व्यक्ती मुद्दामहून तुमचा अवमान करण्याचा प्रयत्न करतील. नोकरी टिकवा. राजकीय, सामाजिक कार्यात सावधपणे बोला. तुमचे मुद्दे घेऊन तुम्हालाच कमी लेखण्याचा प्रयत्न होईल. कोणतीही स्पर्धा सोपी नाही.

वृश्चिक

या सप्ताहात कन्येत बुध वक्री, वृश्चिकेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात वाद करू नका. नवे काम धंद्यात मिळण्याची जिद्द ठेवा. संसारात गैरसमज होईल. नोकरीत प्रभाव पडेल. महत्त्वाची कामे करून घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात ठरविलेली योजना लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. स्पर्धेत प्रगती होईल. मोह टाळा.

धनु

या सप्ताहात कन्येत बुध वक्री, वृश्चिकेत शुक्र प्रवेश करीत आहे. तुमचा उत्साह असला तरी अडचणीवर मात करावी लागेल. अस्थिर होऊ नका. धंद्यात तडजोडीचे धोरण ठेवा. वसुली करा. नोकरीत कामे वाढतील. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला तत्परता दाखवावी लागेल. दूरदृष्टीकोन ठेवा. कायदा पाळा.

मकर

या सप्ताहात कन्येत बुध वक्री, वृश्चिकेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात वाढ होईल. कर्जाचे काम करून घेता येईल. मागील येणे वसूल करा. नवीन ओळखी झाल्याने उत्साह वाढेल. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. संसारातील कामे होतील. कला, क्रीडा, साहित्यात विशेष काम करून दाखवाल. राजकीय, सामाजिक कार्यात सहकार्य मिळेल. प्रतिष्ठा वाढेल.

कुंभ

या सप्ताहात कन्येत बुध वक्री, वृश्चिकेत शुक्र प्रवेश होत आहे. कोणतेही काम करताना कायदा मोडू नका. कठोर शब्द वापरू नका. नोकरी धंद्यात सावध रहा. करार करण्याची घाई करू नका. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. घरातील वृद्ध व्यक्तीसाठी धावपळ करावी लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा अपमान करणारे लोक वाढतील. वाहन हळू चालवा.

मीन

या सप्ताहात कन्येत बुध वक्री, वृश्चिकेत शुक्र प्रवेश होत आहे. धंद्यात सुधारणा होईल. किचकट प्रश्न रेंगाळत ठेवू नका. संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधता येईल. नोकरीत प्रभाव वाढेल. संसारात खर्च होईल. राजकीय, सामाजिक कार्यात वेगाने तुमची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नवीन ओळख होईल. स्पर्धेत प्रगती कराल.

Related Stories

आजचे भविष्य शनिवार दि. 21 मार्च 2020

tarunbharat

आजचे भविष्य 28-05-2021

Amit Kulkarni

आजचे भविष्य गुरुवार दि. 23 जुलै 2020

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 4 एप्रिल 2020

Patil_p

आजचे भविष्य 19-11-2020 गुरुवार

Omkar B

आजचे भविष्य गुरुवार दि.15 एप्रिल 2021

Patil_p
error: Content is protected !!