तरुण भारत

8 हजार फुटांवर वसलेले निर्जन शहर

शेकडो वर्षांपासून याचे रहस्य कायम

जगात अशा अनेक जागा आहेत, ज्या लोकांना थक्क करून सोडतात. असेच एक शहर असून ते 8 हजार फुटांच्या उंचीवर वसलेले आहे. हे शहर 7 जागतिक आश्चर्यांपैकी एक असून ते अनेक वर्षांपासून निर्जन आहे. या जागेशी निगडित अनेक रहस्यांवरील उत्तर कुणाकडेच नाही, याचमुळे या जागेला ‘रहस्यमय शहर’ देखील म्हटले जाते.

Advertisements

या शहराचे नाव माचू पिच्चू असून ते दक्षिण अमेरिकन देश पेरूमध्ये आहे. हे इंका संस्कृतीशी संबंधित एक ऐतिहासिक स्थळ आहे. हे शहर समुद्रसपाटीपासून 2,430 मीटर म्हणजेच 8 हजार फुटांच्या उंचीवर उरुबाम्बा खोऱयावर एका पर्वतावर वसलेले आहे. इंका साम्राज्याच्या सर्वात परिचित प्रतिकांपैकी हे एक आहे.

तसेच याला पेरूचे एक ऐतिहासिक देवालय देखील म्हटले जाते. याचमुळे याला पवित्र स्थान मानण्यात येते. 1983 मध्ये याला युनेस्कोकडून जागतिक वारसास्थळाचा दर्जा देण्यात आला होता. स्थानिक लोक माचू पिच्चूबद्दल पूर्वीपासून जाणून होते. पण हे ठिकाण जगासमोर आणण्याचे शेय अमेरिकन इतिहासकार हीरम बिंघम यांना देण्यात येते. त्यांनी 1911 मध्ये या ठिकाणाचा शोध लावला होता. तेव्हापासून हे ठिकाण जगभरासाठी एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ ठरले आहे. मोठय़ा संख्येत लोक माचू पिच्चू पाहण्यासाठी येतात आणि याचा इतिहास आणि रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न करतात.

ईसवी सन 1450 च्या आसपास इंका लोकांनी याची निर्मिती केल्याचे मानले जाते. पण याच्या सुमारे 100 वर्षांनी स्पॅनिश सैन्याने इंका समुदायावर विजय मिळविला असता त्यांनी या ठिकाणाला कायमस्वरुपी त्यागले होते. तेव्हापासून हे शहर आजपर्यंत निर्जनच आहे. आता येथे केवळ पडक्या इमारतीच आहेत.

माचू पिच्चू शहराची निर्मिती का करण्यात आली हे देखील आतापर्यंत रहस्यच आहे. या ठिकाणाचा वापर मानवी बळी देण्यासाठी केला जायचा असेही बोलले जाते. पुरातत्व तज्ञांना येथे अनेक मानवी सांगाडे मिळाले आहेत. पण आश्चर्याची बाब म्हणजे यातील बहुतांश सांगाडे महिलांचे आहेत. इंका सूर्याला स्वतःचा देव मानायचे आणि त्याच्याकरता कुमारी महिलांचा बळी दिला जायचा अशीही वदंता आहे. पण काही काळानंतर पुरुषांचे सांगाडे मिळाल्यावर हा दावा फेटाळण्यात आला होता. या ठिकाणावरून आणखी एक हैराण करणारी वदंता आहे. माचू पिच्चू माणसाने नव्हे तर परग्रहवासीयांनी तयार केल्याचे काही लोक मानतात.

Related Stories

इस्रायलच्या बहिष्काराचा कायदा संपुष्टात

Patil_p

इटलीतील ज्वालामुखी पर्वत होतोय उंच

Amit Kulkarni

स्कॉट एटलस यांचा राजीनामा

Omkar B

ब्राझील : संसर्ग पुन्हा तीव्र

Omkar B

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची ब्रिटनच्या संसदेत चर्चा

datta jadhav

स्वित्झर्लंड चिंताग्रस्त

Patil_p
error: Content is protected !!