तरुण भारत

एका छोटय़ा छिद्रात सामावते नदी

पाणी कुठे जाते याचा उलगडा नाही

एका छोटय़ा छिद्रात नदीचे अर्धे पात्र सामावून जाणारे एक ठिकाण आहे. नदीचे इतके पाणी अखेर कुठे जाते हे आतापर्यंत समजू शकलेले नाही. अमेरिकेतील एक झरा रहस्यमय असून तेथे निर्माण झालेल्या छिद्राला ‘द डेव्हिल्स केटल’ या नावाने ओळखले जाते. या छिद्रात नदीचे अर्धे पाणी जाते पण आजपर्यंत जगातील कुठलाच वैज्ञानिक हे पाणी अखेर कुठे जाते याचा शोध लावू शकलेला नाही. अमेरिकेच्या ‘सुपीरियर लेक’च्या उत्तर काठावर मिनसोटामध्ये जज सीआर मॅगनेसी पार्क आहे. हा झरा अत्यंत सुंदर असण्यासह रहस्याने भरलेला आहे. या अद्भूत झऱयावरून लोकांमध्ये विविध प्रकारच्या चर्चा रंगत असतात.

Advertisements

ब्रुल नदीचे पाणी या झऱयाचा मुख्य स्रोत आहे. जंगलात झऱयाचे पाणी वळणदार, पर्वतीय मार्गांवरून खालच्या दिशेने वाहते आणि उंचीवरून खाली कोसळताना हे पाणी छिद्रात सामावल्यावर अखेर कुठे जाते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याचा शोध लावण्याचा प्रयत्न अनेकांनी केला पण हे रहस्य अद्याप अनुत्तरित आहे.

Related Stories

204 दिवसांमध्ये भारतात बळींचा आकडा लाखापार

Patil_p

जपानच्या राजकन्येला विवाहाची अनुमती

Patil_p

‘दफनभूमी’सोबत छायाचित्रे काढण्याचा छंद

Amit Kulkarni

भारताकडून पुन्हा सर्जिकल स्ट्राईक होण्याची पाकला भीती

datta jadhav

बाली बेटांजवळ पाणबुडी बुडाली; 53 सैनिकांना वीरमरण

datta jadhav

जगातील सर्वात धोकादायक मसाज

Patil_p
error: Content is protected !!