तरुण भारत

सांगली : सावळजच्या खूर्चीची इंग्लंडमध्ये हवा

सांगली जिल्ह्यातील सावळज गावातील बाळू लोखंडे मंडप वाल्यांच्या खुर्चीची चर्चा सोशल मीडियावर जोरात


रमेश मस्के सावळज / वार्ताहर

Advertisements

सावळजमधील भंगारात विकलेल्या खुर्चीने सावळजचे व बाळु लोखंडे यांचे नाव सातासमुद्रापार इंग्लंडमध्ये पोहोचवले आहे. दोन दिवसांपासून अखंड भारतात आणि खासकरुन महाराष्ट्रात सांगलीच्या तासगाव तालुक्यातील सावळज या गावातील बाळू लोखंडे या मंडप व्यवसायिकाच्या एका लोखंडी खुर्चीची चर्चा सुरू आहे ती खुर्चीच्या व्हायरल व्हिडिओमुळे. ज्येष्ठ क्रीडा विश्लेषक सुनंदन लेले यांनी एक व्हिडिओ ट्विट केला. मँचेस्टरमधील अल्ट्रिक्म भागात फिरत असताना त्यांना एका रेस्टॉरंटच्या परिसरात एक लोखंडी खुर्ची दिसली. या खुर्चीच्या मागे ‘बाळू लोखंडे, सावळज’ असं नावं लिहलेलं आहे.

व्हिडीओचा सोशल मिडीयावर धुमाकूळ

सुनंदन लेले यांनी ” बाळू लोखंडे सावळज ” असं लिहलेल्या लोखंडी खुर्चीचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला. काही तासातच व्हीडीओ सोशल मिडीयावर तूफान व्हायरल झाला आणि एकच चर्चा सुरु झाली. सावळज येथील मंडप व्यवसायिक बाळू लोखंडेची लोखंडी खुर्ची तब्बल ७ हजार ६२७ किलोमीटरचा प्रवास करुन इंग्लंडमधील मँचेस्टरच्या हॉटेलात कशी पोहचली ? याबाबत नेटकऱ्यांनी अनेक विनोदी तर्कवितर्क लढवायला सुरुवात केली आहे. ब्रिटीश खुर्च्या चोरुन घेऊन गेले. असे अनेक चर्चांना उधाण आले.

सुनंदन लेले यांनी ट्विट केलेल्या बाळू लोखंडे यांच्या खुर्चीच्या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. खुर्ची सातासमुद्रापार कशी गेली याच सुरस कथा कमेंटमध्ये पोस्ट झालेल्या आहेत. काही युजर्सनी उपरोधिकपणे भारताला स्वातंत्र्य दिल्यानंतर परत जाताना ब्रिटिशांनी ही खुर्ची चोरून नेली असावी अशा शंका कमेंटमध्ये व्यक्त केलेल्या आहेत. तर काहींनी ब्रिटिशांनी खुर्चीसुद्धा सोडली नाही, अशा गंमतीदार कमेंट केलेल्या आहेत. मात्र भंगारात विकलेल्या खुर्चीच्या निमित्ताने सावळजचे व बाळु लोखंडे यांचे नाव इंग्लंडमध्ये पोहोचले आहे.
मात्र या व्हायरल व्हिडिओतील लोखंडी खुर्चीचा सावळजपासून ते मँचेस्टर पर्यंतच्या प्रवासा कसा झाला हे लोखंडे यांनी सांगितले आहे. एका सामान्य कुटूंबातील मोलमजुरी करुन पोट भरणाऱ्या बाळू लोखंडे यांनी १५ वर्षापूर्वी स्वत:चा मंडप उभारणी व सजावटीचा व्यवसाय सुरु केला होता. अनेक कार्यक्रमांत जेवणासाठी टेबल व खुर्चीची मागणी व्हायला लागली. मंडप व्यवसायास जोडधंदा म्हणून केटरिंगचे साहित्यही आणले. त्यामध्ये लोखंडी खुर्च्या होत्या.

सदरच्या खुर्च्या त्यांनी १५ वर्षापूर्वी हुबळी कर्नाटक येथून घेतल्या होत्या. एका खुर्चीचे वजन १३ किलो होते. वजनाने अतिशय जड लोखंडी खुर्च्या नंतर मात्र हाताळण्यास जड वाटू लागल्या. काळाच्या ओघात ग्राहकही प्लॅस्टिक खुर्च्यांची मागणी करु लागले होते. यामुळे काही वर्षापूर्वी त्यानी लोखंडी खुर्च्या भंगारात कवठेमहांकाळ (जि. सांगली) येथे १० रुपये किलो दराने विकून टाकल्या. काही खुर्च्या आजही आठवण म्हणून जपून ठेवल्या आहेत. भंगारात विकलेल्या या खुर्च्या पुढे मुंबईपर्यंत गेल्या. नंतर एका परदेशी व्यवसायिकाने दुर्मिळ खुर्च्या म्हणून विकत घेतल्या. पुर्वीच्या काळातील मजबूत लोखंड असल्यामुळे यापैकी कांही खुर्ची मॅंचेस्टरच्या रेस्टॉरंट मालकाने विकत घेतल्या. या खुर्च्या ग्राहकांना बसायला ठेवल्या आहेत.

सुनंदन लेलेंचा लंडनमधूनच बाळू लोखंडेना फोन”

बाळु लोखंडेची लोखंडी खुर्ची लंडनमध्ये पाहिल्यानंतर सुनंदन लेलेंनी थेट बाळू लोखंडेना फोन केला. मॅंचेस्टरच्या मार्केटमध्ये एका मराठी माणसाच नाव पाहून मी भारावून गेलो. म्हणून हा व्हिडीओ पोस्ट केला. व्हिडोओ पोस्ट केल्यानंतर राज्यमंत्री विश्वजीत कदम, पाणी फाऊंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांनी मला संपर्क केला असे लेले यांनी फोनवरुन सांगितले. तर लंडनहून भारतात परत आल्यानंतर सावळजला भेट घ्यायला येणार असल्याचे सुनंदन लेलेनी सांगितले. भंगारातील वस्तुच नशीब कुठे असेल याचा अंदाज नाही. मात्र या भंगारात विकलेल्या खुर्चीने मात्र सावळजचे नाव सातासमुद्रापार पोहोचवले आहे.

Related Stories

मलकापुरातील बाजारपेठ सुरु होणार, नियमाचे उल्लंघन झाल्यास कारवाई

Abhijeet Shinde

सातारा : लॉकडाऊनच्या भात्यातील शेवटचा दिवस

Abhijeet Shinde

वाई तालुक्यातील 5 जणांचा मृत्यू

Patil_p

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट

Abhijeet Shinde

सातारा तहसीलदारांचा सावळा गोंधळ

Patil_p

कोल्हापूर : लक्षतीर्थमध्ये बालविवाह रोखला

Abhijeet Shinde
error: Content is protected !!