तरुण भारत

कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांची घंटा वाजणार

विद्यार्थी, शिक्षक, रिक्षावाले मामा यांना दिलासा

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

राज्यातील पाचवी ते बारावीच्या शाळा 4 ऑक्टोंबरपासून सुरू करण्यास सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 2 हजारहून जास्त शाळा सुरू होणार आहेत. ऑनलाईन शिक्षणातून लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. तर शेकडो रिक्षाचालकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि रिक्षाचालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

गेल्या पावणेदोन वर्षापासून ऑनलाईन शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांनी शाळा सुरू होणार अशी वार्ता ऐकताच सुटकेचा निश्वास सोडला. शहरातील शाळांही स्वच्छता, सॅनिटायझेशनच्या तयारीत लागल्या आहेत. तसेच रिक्षा मांमांनाही रोजगार मिळणार असल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. पाचवी ते बारावीपर्यंतच्या 4 लाख 53 हजार 543 विद्यार्थ्यांना उर्वरीत चालू शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष अध्यापनाची संधी मिळणार आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत शाळा सुरू करण्यात येणार आहेत.

वर्गनिहाय विद्यार्थी

वर्ग विद्यार्थी संख्या
पाचवी 57841
सहावी 57395
सातवी 58320
आठवी 58800
नववी 60226
दहावी 56745
अकरावी 51359
बारावी 53457
एकूण 453543

Related Stories

दोन लाखांवरील थकबाकीदार शेतकरी ऑक्सिजनवर

triratna

मोटारीची काच फोडून ४ लाखांची रोकड लंपास

triratna

घोषणा नको,आता कार्यवाही करा – समरजितसिंह घाटगे

triratna

कोल्हापूर जिल्ह्यातील गणेश मंडळाच्या नोंदणीला प्रारंभ

triratna

कोल्हापूर गगनबावडा मार्गावर ट्रकचा अपघात, पाचजण गंभीर जखमी

triratna

कोल्हापूर : सावे येथे तीन वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार, संशयितास अटक

triratna
error: Content is protected !!