तरुण भारत

शिरोली-सांगली रस्ता नॅशनल हायवे ऍथॉरिटीकडे

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

रत्नागिरी-कोल्हापूर-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली ते सांगली पर्यंतचा रस्ता नॅशनल हायवे ऍथॉरिटीकडे हस्तांतरण करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी कराड येथील लोकार्पण आणि विविध रस्ते कामाचा कोनशिला अनावरण कार्यक्रमात ही घोषणा केली. खासदार धैर्यशील माने यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. सहा महिन्यांत रस्त्याचा डीपीआर करून रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन करु असे आश्वासनही मंत्री गडकरी यांनी खासदार धैर्यशील माने यांना दिले. त्यामूळे मृत्यूचा सापळा बनलेला सांगली-कोल्हापूर महामार्ग आता मोकळा श्वास घेणार आहे.

पूर्वी या रस्त्याचे बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर बांधण्यात आला. सुप्रीम कंपनीला याचा ठेका दिला होता. मात्र कंपनीने काम पूर्ण न करतानच हालोंडी येथे टोल नाके उभारुन वसुलीची तयारी सुरु केल्याने नागरीकांतून तीव्र विरोध सुरु झाला. याची दखल घेऊन तात्कालीन बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी टोल रद्द केली. रस्ते बांधणीसाठीचा खर्च राज्य सरकारच्या तिजोरीतून देण्याची घोषणा केली. हातकणंगले, तमदलगे, जयसिंगपूर येथे सध्या काम रखडले आहे. यासाठी मोठा निधी लागणार आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याशिवाय हे काम होणे शक्य नाही. ही भूमिका घेऊन खासदार माने यांनी पाठपुरावा सुरु केला होता. त्याला शनिवारी यश आले.

Related Stories

कोल्हापुरात गारांचा पाऊस

triratna

कोल्हापूर : स्वतःची काळजी स्वतः घेणे गरजेचे आहे त्यासाठी सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करा – माजी आमदार अमल महाडिक

triratna

सांगली जिल्ह्यात केंद्रीय सैनिक स्कूल स्थापन करावे : खा. संजय पाटील

triratna

सांगलीत नवे 14 कोरोना रुग्ण, तर 37 कोरोनामुक्त

triratna

कोल्हापूर : कबनूर येथे कोरोनाचे आठ रुग्ण आढळले

triratna

हालोंडीत पंचवीस एकर ऊस, दीड एकर केळीची बाग जळून खाक

triratna
error: Content is protected !!