तरुण भारत

केआयटीच्या विद्यार्थ्यांची सिरम इन्स्टिट्यूटमध्ये निवड

प्रतिनिधी / कोल्हापूर

केआयटीच्या अभियांत्रिकी स्वायत्त महाविद्यालयामधील बायोटेक्नोलॉजी विभागाच्या प्रतीक पाटील आणि संदीप बेर्गल या विद्यार्थ्यांची सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीमध्ये निवड झाली. दोन्ही विद्यार्थी कोरोना लसीचे उत्पादन विभागामध्ये रुजू झाले, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी , उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले यांनी दिली. त्यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या.

Advertisements

सध्याच्या कोरोना काळात बायोटेक सेक्टर मधील संशोधनाचे महत्व कोरोना लसीमुळे सर्व जगासमोर आले. त्या निमित्ताने बायोटेक मधील कामाचे स्वरूप आणि कंपनी सर्व जगासमोर आल्या. बऱयाच फार्मासुटिकल कंपनी कोरोना लसीचे उत्पादन करण्यातही पुढे आल्या आहेत. अश्या विविध कंपन्यांमध्ये बायोटेकनॉलॉजि इंजिनिर्सची गरज असते. त्यामध्ये सध्या कोविशील्ड लसीमुळे चर्चेत असलेली कंपनी म्हणजे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. प्लेसमेंट समन्वयक प्राध्यापक ऋतुपर्ण करकरे यांनी मुलाखतीचे नियोजन केले होते. यासाठी केआयटीचे डीन डॉ अमित सरकार, बायोटेक विभागप्रमुख डॉ पल्लवी पाटील, केआयटीचे प्रभारी संचालक आणि कुलसचिव डॉ मनोज मुजुमदार यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यासाठी 62 हजार 500 कोविशिल्ड लसींचे डोस

triratna

कोल्हापूर : खोकुर्ले येथील बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह सापडला

triratna

सीपीआर पुन्हा कोरोना आयसोलेटेड!

triratna

कोल्हापूर : शेतक-यांच्या मदतीसाठी समरजितसिंहांच्या पायाला भिंगरी…

triratna

नियमांचे पालन करीत महात्मा फुले जयंती साजरी

triratna

हीच वेळ हद्दवाढीची!

triratna
error: Content is protected !!