तरुण भारत

अमेरिकेत 17 वर्षाखालील 56 टक्के मुलांना पहिला डोस

टेक्सास

 कोरोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात झालेल्या अमेरिकेत लसीकरणाला वेग येताना दिसतो आहे. अलीकडच्या काळात मुलांना लस देण्याच्या प्रयत्नामध्ये वाढ झाली आहे. तेथील 12 ते 17 वर्षापर्यंतच्या 56 टक्के मुलांना लसीचा पहिला डोस देण्याचे कार्य पूर्ण करण्यात आले आहे. अमेरिकेत कोरोनाच्या डेल्टाचा धोका अधिक दिसून आला आहे. शाळा आणि सार्वजनिक ठिकाणे खुली झाल्यानंतर सरकारने मुलांना महामारीपासून वाचवण्यासाठी युद्धपातळीवर त्यांचे लसीकरण करण्याचे अभियान सुरू केले आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शन यांच्यानुसार अमेरिकेत 12 ते 17 वर्षाखालील मुलांना पहिला डोस देण्यात आला असून आतापर्यंत 56 टक्के जणांना ही लस दिली गेली आहे. तर याचप्रमाणे देशातील 45 टक्के जणांना लसीचा दुसरा डोसही दिला गेला असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुलांमध्ये लसीबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत.

Advertisements

Related Stories

पाकमध्ये 60 हिंदूंचे जबरदस्ती धर्मांतर

datta jadhav

ब्रिटनमधील टाळेबंदी सुरूच राहणार

Patil_p

अमेरिकेतील साऊथ डकोटामध्ये ‘या’मुळे वाढला कोरोनाचा धोका

prashant_c

रशियाच्या पावलामुळे जग दहशतीत

Patil_p

चीनमधील दोन शहरांची नाकेबंदी, अवागमन बंद

Patil_p

बनावट वैमानिकांमुळे पाकिस्तानवर ओढवली नामुष्की

Patil_p
error: Content is protected !!