तरुण भारत

अन्यथा बुधवारी महापालिकेसमोर आंदोलन भाजप माजी गटनेते अजित ठाणेकर यांचा इशारा

प्रतिनिधी / कोल्हापूर

निविदा प्रक्रीया पूर्ण करण्यापुर्वीच नागाळा पार्क प्रभागात 30 लाख रुपयांचे चॅनेलचे काम सुरु होते. तसेच यापुर्वी ठेकेदारांच्या व्हॉटस् ऍप ग्रुपवर 13 कोटींच्या विकास कामात 18 टक्के कमिशनचा पडलेला मॅसेज प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे. कागदपत्रे सादर करुनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने प्रशासनाचा निषेध करत आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करुन दोषींवर गुन्हे दाखल न केल्यास भाजपकडून बुधवार 29 रोजी महापालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे माजी गटनेते अजित ठाणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. तसेच आंदोलनाची दखलही न घेतल्यास याप्रकरणी न्यायालयात जाणार असल्याची माहितीही ठाणेकर यांनी दिली.

Advertisements
ठाणेकर म्हणाले, नागाळा पार्क प्रभागात 30 लाख रुपयांचे चॅनेलचे काम टेंडर प्रक्रीया पूर्ण होण्याअधिच सुरु झाले होते. प्रभागाचे माजी नगरसेवक व महापालिकेचे माजी पदाधिकारी यांच्या नावाने ठेकेदारांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट झाला आहे. यामध्ये हे काम आम्ही सुरु केले असून यामध्ये अन्य कोणी हस्तक्षेप करु नये असा उल्लेख आहे. याबाबत माहिती घेतली असता  या कामाची अद्याप निविदा प्रक्रीया पूर्ण झालेली नाही. तसेच काम सुरु करताना प्रशासकांची पूर्व परवानगी घेतलेली नाही. हा गंभीर प्रकार प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या सामोर उघड केला आहे. तसेच काम ज्यांनी सुरु केले व ज्यांनी  सुरु करण्यास सांगितले, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी 22 सप्टेंबर रोजी केली होती. 

त्याचबरोबर विविध विकासकामांसाठी महापालिकेत आणलेल्या 13 कोटींच्या विकास कामातही 18 टक्के कमिशन मागणीचा प्रकारही उघडकीस आला आहे. यासंदर्भातही कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षक व प्रशासक यांच्याकडे केली आहे. याप्रकाराबाबत गेले महिनाभर वारंवार पाठपुरावा करुनही कारवाई होत नसल्याने महापालिकेसमोर भाजप 29 सप्टेंबरपासून तीव्र आंदोलन सुरु करणार असल्याचे ठाणेकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विजयसिंह खाडे-पाटील, माजी नगरसेवक चंद्रकांत घाटगे उपस्थित होते.

Related Stories

कोल्हापूर : नव्या रूग्णांत घट, सक्रीय रूग्णात वाढ

triratna

शिरढोण जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

triratna

कोल्हापूर : शिरगावात शेतात आढळले १ महिन्याचे अर्भक

triratna

कोल्हापूर जिल्ह्यात`कोविशिल्ड’चे 1 लाख डोस उपलब्ध

triratna

कोल्हापूर : जिल्हा परिषद उपाध्यक्षांना कोरोनाची लागण, 31 नवे पॉझिटिव्ह

triratna

शिवछत्रपती पुरस्कार विजेते दिलीप जोशी यांचे निधन

triratna
error: Content is protected !!