तरुण भारत

दीनदयाळ यांचे विचार अनुकरणीय

प्रतिनिधी/ बेळगाव

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्मदिन उत्साहात साजरा करण्यात आला. लोकमान्य टिळक चौक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रभाग क्रमांक 4 चे नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती, भाजप ओबीसी राज्य युवा मोर्चाचे अध्यक्ष किरण जाधव, महानगरसह प्रभारी ऍड. रमेश देशपांडे यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

Advertisements

मानवतावादीदृष्टीने समाजाकडे पहा, संघटित समाज देशहितासाठी पूरक ठरू शकतो. यासाठी संघटित होऊन प्रगती साधा, असे नेहमीच दीनदयाळ उपाध्याय म्हणायचे. त्यांच्या या उदात्त विचारांचे अनुकरण करून आदर्श समाज निर्माण केल्यास दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्मदिन साजरा करणे सार्थ ठरणार असल्याचे किरण जाधव यांनी सांगितले. अन्य मान्यवरांची यावेळी समयोचित भाषणे झाली. याप्रसंगी विक्रम राजपुरोहित, किरण कलकुप्पी, शीतल चिक्कन्नवर, राघवेंद्र कट्टी, अनिल मुतगेकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच लोकमान्य रिक्षा स्थानकावरील रिक्षाचालक उपस्थित होते.   

Related Stories

डीयूएफसी, युनायटेड ब्रदर्स विजयी

Amit Kulkarni

कार झाडावर आदळून शहापूरचा तरुण ठार

Patil_p

मोठय़ा भावाचा लहान भावाकडून खून

Amit Kulkarni

किरणवर एफआयआर; बडे पोलीस अधिकारी संकटात

Patil_p

हलगा ग्रामस्थांना ती सात एकर जागा गायरानसाठी द्या

Patil_p

सिव्हिलच्या सुरक्षेची जबाबदारी आता पोलिसांवर

Amit Kulkarni
error: Content is protected !!