तरुण भारत

कांदा 200 रु. नी वाढला, जवारी बटाटा, रताळी दरात घट

महाराष्ट्रातील कांद्याची आवक घटली -रताळी आवक वाढली

वार्ताहर/ अगसगे

Advertisements

बेळगाव एपीएमसीमध्ये शनिवारच्या बाजारात कांदा दरात प्रतिक्विंटल 200 रुपयांनी वाढ झाली आहे तर जवारी बटाटा व रताळय़ाच्या भावात प्रतिक्विंटल 200 रुपयांची घट झाली असून इंदौर व आग्रा बटाटय़ाचा भाव मात्र स्थिर आहे. याचबरोबर भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे.

महाराष्ट्रातील जुना कांदा आवक कमी प्रमाणात विक्रीसाठी येत आहे व महाराष्ट्रातीलच बाजारपेठेमध्ये शेतकऱयांना भाव मिळत असल्याने शेतकरी बेळगाव बाजारपेठेत कमी प्रमाणात येत आहेत.

सध्या कर्नाटकातील नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. हा कांदा कच्चा असल्याने व पावसामध्ये भिजल्यामुळे कांदा खराब होत आहे. यामुळे खरेदीदार महाराष्ट्र कांदा जुना व टिकाऊ असल्याने महाराष्ट्र कांदा व्यापारी खरेदी करत आहेत. आवक कमी व खरेदी वाढल्याने महाराष्ट्र कांदा भाव प्रतिक्विंटल 200 रुपयांनी वाढला आहे.

सध्या उघडीप पडल्याने तालुक्मयामध्ये लाल जमिनीमधील व मसार जमिनीमध्ये रताळी, जवारी बटाटे काढण्यास मोठय़ा प्रमाणात सुरुवात झाली आहे. यामुळे शनिवारी बाजारात जवारी बटाटय़ाची सुमारे सात हजार पिशव्या तर रताळय़ाची सुमारे पाच हजार पिशव्या आवक विक्रीसाठी आली होती. रताळी व जवारी बटाटा यांचा दर प्रतिक्विंटलला 200 रुपयांनी कमी झाला आहे.

शनिवारी बाजारात महाराष्ट्र कांद्याची पंधरा ट्रक, कर्नाटक कांदा 30 ट्रक, इंदौर बटाटा आठ ट्रक व हासन बटाटा दहा ट्रक आवक विक्रीसाठी होती, अशी माहिती अडत व्यापारी अशोक बामणे यांनी दिली.

गोवा, कारवार, जोयडा व कोकण भागामध्ये भाजीला मोठय़ा प्रमाणात मागणी येत आहे. ढबू मिरची, शेपू, लालभाजीची आवक भाजी मार्केटमध्ये कमी येत आहे. यामुळे भाज्यांच्या दरात वाढ झाली असल्याची माहिती भाजी व्यापारी भैरू कंग्राळकर यांनी दिली.

महाराष्ट्र कांदा प्रतिक्विंटल

गोळी      1200 ते 1400 रु.

मिडियम  1800 ते 2000 रु.

मोठवड   2100 ते 2200 रु.

गोळा      2200 ते 2400 रु.

कर्नाटक कांदा प्रतिक्विंटल

गोळी      200 ते 400 रु.

मिडियम  800 ते 1200 रु.

मोठवड   1400 ते 1600 रु.

गोळा      1700 ते 1800 रु.

हासन बटाटा

गोळी      500 ते 800 रु.

मिडियम  1000 ते 1200 रु.

गोळा      1200 ते 1400 रु.

जवारी बटाटा प्रतिक्विंटल

गोळी      200 ते 300 रु.

मिडियम  800 ते 1000 रु.

मोठवड   1300 ते 1400 रु.

गोळा      1400 ते 1500 रु.

इंदौर बटाटा     1200 ते 1400 रु.

आग्रा बटाटा     1000 ते 1200 रु.

रताळी    800 ते 1200 रु.

भाजी प्रतिदहा किलोचा भाव

ढबू मिरची     400 ते 600 रु.

कारली          200 ते 250 रु.

दोडकी          300 ते 350 रु.

कोबी            60 ते 70 रु.

इंग्लीश गाजर 220 ते 250 रु.

फ्लॉवर दीड डझन         300 ते 350 रु.

भेंडी             200 ते 250 रु.

टोमॅटो प्रति टे   250 ते 300 रु.

शेकडा भाव

मेथी             600 ते 800 रु.

शेपू              400 ते 600 रु.

पालक           200 ते 350 रु.

कांदापात      200 ते 300 रु.

कोथिंबिर      800 ते 1500 रु.

लालभाजी     400 ते 600 रु.

Related Stories

कुडचीत आशा कार्यकर्त्यांवर हल्ला

Patil_p

सोमवारी कोरोनाचे 16 नवे रुग्ण

Patil_p

पत्रकारितेचे आयाम पूर्णतः बदलले

tarunbharat

कंप्लीट कराटे अकादमीच्या विद्यार्थ्यांना बेल्ट प्रदान

Amit Kulkarni

‘बगीचा रेस्टॉरंट’तर्फे आजपासून ‘ओरिएंटल फूड फेस्टिव्हल’

Amit Kulkarni

येळ्ळुरात चिमुकल्यांनी साकारला राजहंसगड

Patil_p
error: Content is protected !!