तरुण भारत

अंगणवाडी सेविकांचे तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन

खानापूर / प्रतिनिधी

गेल्या पंचवीस वर्षांपासून तालुक्मयातील मराठी भागातील अंगणवाडी केंद्रांमध्ये मदतनीस म्हणून काम केलेल्या महिला कर्मचाऱयांना अंगणवाडी शिक्षिकापदी बढती मिळणे आवश्यक आहे. त्यांची तृतीय भाषा कन्नड असल्याने राज्य सरकारचे कन्नड हे प्रथम व द्वितीय भाषा अनिवार्य असल्याचे धोरण त्यांच्या नियुक्ती व बढतीआड येत आहे. या नियमात बदल करून बढती व नेमणुकीत कन्नड तृतीय भाषा शिकलेल्यांचाही विचार करण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी शनिवारी तालुक्मयातील अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनिसांनी तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले.

Advertisements

 अंगणवाडी कार्यकर्त्यांना आठ-नऊ तास काम करावे लागत आहे. आरोग्य विभाग, कोरोना लसीकरण, गर्भवतींची माहिती, पोषण आहाराचे वितरण, बालक व बाळंतिणींच्या आरोग्याची निगा यासारखी कामे करावी लागत आहेत. त्यांच्या सेवेचे मोल लक्षात घेऊन भारतीय कामगार परिषदेच्या 45 आणि 46 व्या अधिवेशनात करण्यात आलेल्या शिफारशीनुसार आयसीडीएस योजनेतील कामगारांना एकवीस हजार रुपये कनि÷ मासिक वेतन आणि दहा हजार रुपये निवृत्ती वेतन देण्याची सोय करण्यात यावी.

कोरोना काळात अग्रभागी असणाऱया अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मदतनिसांना 50 लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण देण्यात यावे, सेवेत असताना मृत्यू झाल्यास या विमा सुविधेचा लाभ देण्यात यावा, कोरोना काळात कराव्या लागणाऱया अतिरिक्त सेवेचा मोबदला म्हणून दहा हजार रुपये अतिरिक्त मानधन देण्यात यावे. सेवा काळात कोरोनाची बाधा झाल्यास उपचाराकरिता दहा लाख रुपयांची मदत देण्यात यावी. कामगारविरोधी कायदे मागे घेण्यात यावेत आदी मागण्या करण्यात आल्या. मेघा मिठारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे तहसीलदारांना निवेदन सादर केले.

पोषण अभियानांतर्गत अंगणवाडी केंद्रांकडून राबविण्यात येणाऱया उपक्रमांची माहिती राज्य सरकारला वेगळय़ा ऍपमधून आणि केंद्र सरकारला वेगळय़ा ऍपमधून पाठवावी लागत आहे. एकच माहिती वेगवेगळय़ा दोन ऍपमध्ये नोंदणी करावी लागत असल्याने अंगणवाडी कर्मचाऱयांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक ज्ये÷ व निवृत्तीनजीक आलेल्या अंगणवाडी कार्यकर्त्यांना मोबाईल ऍप्सचा वापर करण्याचे ज्ञान नाही. अनेकांना दृष्टिदोष आहेत. त्यामुळे समग्र माहिती नोंद करणे अडचणीचे ठरत आहे. या कामाकरिता मिनी टॅबचे वितरण करण्यात यावे. शनिवारी राज्यभर अंगणवाडी कर्मचाऱयांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयांना घेराव घालून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.

Related Stories

सैन्य भरती कार्यालयातर्फे भरती मेळावा

Patil_p

परिवहन मंडळाला दररोज 80 लाखाचा फटका

Patil_p

शेतकरी-कामगारांसाठी चळवळ हाती घेणे गरजेचे

Patil_p

पावसाळय़ातील गमबूट गायब, प्लास्टिक-रबरी बुटांनाच पसंती

Patil_p

पर्यटकांअभावी बुद्धगयाची स्थिती गंभीर

Omkar B

चोरी प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची धडक तामिळनाडूला

Omkar B
error: Content is protected !!