तरुण भारत

जीआयटी-महेश फौंडेशनमध्ये समन्वय करार

प्रतिनिधी/ बेळगाव

सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून केएलएस गोगटे इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (जीआयटी)चा एमबीए विभाग व महेश फौंडेशन यांच्यात समन्वय करार करण्यात आला. कौशल्य आधारित प्रशिक्षण, प्लेसमेंट, औद्योगिक भेटी, आणि तज्ञ व्याख्याते यासाठी हा समन्वय करार करण्यात आला आहे.

Advertisements

महेश फौंडेशन ही संस्था एड्सबाधित, दिव्यांग व वंचित मुलांसाठी कार्य करीत आहे. प्राचार्य डॉ. जयंत कित्तूर म्हणाले, कर्मचाऱयांसाठी कौशल्य प्राप्त करणे, मिळालेल्या वेळेचा समाजासाठी वापर करणे यासाठी हा समन्वय करार फायदेशीर ठरेल, तसेच एमबीए विभागाने या कार्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी एमबीए विभागाचे कौतुक केले. यावेळी जीआयटीचे डीन डॉ. के. एस. एल. दास म्हणाले महेश फौंडेशन गरजू विद्यार्थ्यांसाठी कार्य करीत आहे. या संस्थेसाठी जीआयटी स्पोकन इंग्लिश, संगणक शिक्षण यासह इतर उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महेश फौंडेशन व जीआयटीचे प्राध्यापक उपस्थित होते. 

Related Stories

माळी गल्ली मंडळातर्फे नागरिकांना धान्याचे वाटप

Patil_p

उत्सव स्पेशल रेल्वे उद्यापासून धावणार

Patil_p

आशा कर्मचाऱ्यांची काँग्रेस नेते डी. के. शिवकुमारांनी घेतली भेट

triratna

रामकृष्ण मिशन आश्रमतर्फे उद्यापासून ऑनलाईन व्याख्यानमाला

Omkar B

फास्टफूड दुकानांबाबत मनपाकडे तक्रार

Amit Kulkarni

मदतीसाठी सरसावला माजी विद्यार्थी संघ

Amit Kulkarni
error: Content is protected !!