तरुण भारत

पाच ‘कॅप्टन’ समर्थकांना मंत्रिमंडळातून डच्चू

पंजाबमध्ये नव्या मंत्र्यांची यादी राज्यपालांकडे – आज सायंकाळी शपथविधी

अमृतसर / वृत्तसंस्था

Advertisements

चरणजीत सिंग यांच्या नेतृत्त्वाखालील पंजाब मंत्रिमंडळात सहभागी होणाऱया नव्या मंत्र्यांची यादी निश्चित करण्यात आली आहे. या यादीमध्ये सात नव्या चेहऱयांना संधी देण्यात आली असून कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या निकटवर्तियांपैकी 5 जणांना वगळण्यात आले आहे. याव्यतिरिक्त आठ नव्या मंत्र्यांना संधी देण्यात आली आहे.

गेल्या आठवडय़ातच पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा देताच नवे मुख्यमंत्री म्हणून चरणजीत सिंग यांनी शपथ ग्रहण केली आहे. त्यानंतर आता नव्या मंत्र्यांची यादीही निश्चित करण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी नव्या मंत्रिमंडळाच्या निवडीमध्ये विशेष लक्ष घातलेले दिसत आहे. नव्या मंत्र्यांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आली असून रविवारी सायंकाळी 4.30 वाजता सर्व मंत्री शपथग्रहण करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. यापूर्वी पहिल्या टप्प्यात चरणजीत सिंह चन्नी यांच्यासह सुखजिंदर रंधावा आणि ओपी सोनी यांनी शपथ घेतली आहे.

नव्या मंत्रिमंडळात साधू सिंह धर्मसोत, बलवीर सिद्धू, राणा गुरमीत सोढी, गुरप्रित कांगड आणि सुंदर शाम अरोरा यांना संधी मिळू शकलेली नाही. यापैकी साधू सिंह धर्मसोत यांच्यावर पोस्टमॅट्रिक घोटाळय़ाचे आरोप निश्चित झाले होते.

 नव्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून काँग्रेस हायकमांड संभ्रमावस्थेत होते. मागील आठवडाभरात तीनवेळा बैठका घेऊनही यादी निश्चित होऊ शकली नव्हती. शुक्रवारी रात्रीही उशिरापर्यंत राहुल गांधी यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. जुन्या मंत्र्यांना हटविल्यास ते कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या गटात सहभागी होण्याची शक्यता असल्याने नवे मंत्रिमंडळ निश्चित करताना पक्षातील वरिष्ठांचा बराच कस लागला होता.

Related Stories

यूपीत सामूहिक धर्मांतरणाविरोधातही होणार कायदा

datta jadhav

लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी आणखी दोघांना अटक

datta jadhav

बिहारमध्ये 581 नवे कोरोना रुग्ण; 7 मृत्यू

Rohan_P

महाराष्ट्रात कोरोना : बुधवारी 58,952 नवीन रुग्ण; 287 मृत्यू

Rohan_P

कोरोनाचा प्रसार वाढताना लॉकडाऊन हटवला जातोय

Patil_p

मुख्यमंत्र्यांची चार वाजता बैठक ; मुंबईतील कोरोना स्थितीचा घेणार आढावा

triratna
error: Content is protected !!