तरुण भारत

मोदींकडे 3.07 कोटींची मालमत्ता

मागील वर्षाच्या तुलनेत 22 लाखांची वाढ

@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मालमत्तेत मागील वर्षाच्या तुलनेत 22 लाख रुपयांची वाढ झाली आहे. पंतप्रधानांच्या संकेतस्थळावर प्रसारित आकडेवारीनुसार मोदींच्या मालमत्तेचे मूल्य 3.07 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील वर्षी हा आकडा 2.85 कोटी रुपये इतका होता.

पंतप्रधानांच्या मालमत्तेतील वाढ प्रामुख्याने स्टेट बँकेच्या गांधीनगर शाखेतील मुदत ठेवींमुळे झाली आहे. 31 मार्च 2021 रोजी यात 1.86 कोटी रुपये जमा होते. मागील वर्षी ही रक्कम 1.6 कोटी रुपये इतकी होती. मोदींच्या नव्या घोषणेनुसार 31 मार्च 2021 रोजी त्यांची बँकेतील रक्कम 1.5 लाख रुपये होती तर त्यांच्याकडे 36,000 रुपये रोख होते.

पंतप्रधान मोदींची स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये कुठलीच गुंतवणूक नाही. त्यांनी नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेटमध्ये 8,93,251 रुपये, जीवन विमा पॉलिसींमध्ये 1,50,957 रुपये आणि एलअँडटी इन्फ्रास्ट्रक्चर बाँड्समध्ये 20 हजार रुपये गुंतविले आहेत. मोदींनी 2012 साली हे बाँड्स खरेदी केले होते.

सोन्यात गुंतवणूक

मोदींकडे सोन्याच्या 4 अंगठय़ा असून त्यांचे मूल्य 1.48 लाख रुपये आहे. त्यांची एकूण स्थावर मालमत्तेचे मूल्य सुमारे 1.97 कोटी रुपये आहे. घोषणापत्रानुसार पंतप्रधानांवर कुठलेच कर्ज नाही. तसेच त्यांच्या नावावर कुठलेच वाहन देखील नाही.

स्थावर मालमत्ता

पंतप्रधानांकडे गुजरातच्या गांधीनगरमध्ये सेक्टर-1 मध्ये एक भूखंड आहे. या मालमत्तेत त्यांच्यासोबत आणखीन तीन जण हिस्सेदार आहेत. यातील प्रत्येकाकडे 25 टक्के हिस्सा आहे. हा भूखंड 3,531.45 चौरस फुटांचा आहे. मोदींनी ही मालमत्ता गुजरातचे मुख्यमंत्री होण्याच्या 2 महिन्यांपूर्वी म्हणजेच 2002 साली खरेदी केली होती. त्यावेळी या भूखंडाची किंमत 1.3 लाख रुपयांच्या आसपास होती. मोदींनी 2014 मध्ये पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून कुठलीच मालमत्ता खरेदी केलेली नाही.

Related Stories

मिशन 250 : बंगाली शिकत आहेत शाह

Patil_p

फेसबुक खाते बंद करा अन्यथा सैन्य सोडा!

Patil_p

‘एनपीआर’ला स्थगिती देण्यास स्पष्ट नकार

Patil_p

केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांच्या पत्नीसह अन्य 6 जणांना कोरोनाची बाधा

Rohan_P

अमली पदार्थ प्रकरणी 12 जणांविरुद्ध गुन्हे

Patil_p

मध्य प्रदेशातील ‘या’ जिल्ह्यातही आता असणार रविवारी लॉकडाऊन

Rohan_P
error: Content is protected !!