तरुण भारत

16 वर्षांनी सापडला सैनिकाचा मृतदेह

2005 मध्ये सतोपंथ शिखरावर फडकविला होता तिरंगा- परतताना कोसळले होते दरीत

वृत्तसंस्था  / गाजियाबाद

Advertisements

उत्तर प्रदेशच्या गाजियाबाद येथील एका हुतात्मा सैनिकाचा मृतदेह त्याच्या मृत्यूच्या 16 वर्षांनी उत्तराखंडच्या बर्फात सापडला आहे. गिर्यारोहक सैनिकांचे एक पथक 2005 मध्ये गंगोत्री हिमालयातील सर्वात उंच शिखर सतोपंथवर तिरंगा फडकवून परतत असताना संतुलन बिघडल्याने दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेत 4 सैनिक शेकडो फूट खोल दरीत कोसळले होते. 4 जणांपैकी एकाचाही मृतदेह सापडला नव्हता.

16 वर्षांनी मृतदेह मिळाला असून सैनिकाचा गणवेश, नेमप्लेट आणि शरीर देखील बऱयाचअंशी सुरक्षित आहे. कुटुंबाने मृतदेहाची ओळख पटविली आहे. हुतात्मा सैनिक अमरीश त्यागी गाजियाबादच्या हिसाली गावाचे रहिवासी होते.

भारतीय सैन्याचे 25 सदस्यांचे एक पथक सतोपंथ शिखर सर करण्यासाठी 12 सप्टेंबर रोजी उत्तरकाशी येथून रवाना झाले होते. या शिखराची उंची सुमारे 7,075 मीटर इतकी आहे. मोहिमेदरम्यान सैन्याच्या पथकाला 23 सप्टेंबर रोजी हर्षिल या ठिकाणी बर्फात गाडला गेलेला अमरीश त्यागी यांचा मृतदेह आढळून आला. सैनिकांनी हा मृतदेह गंगोत्री येथे आणत पोलिसांच्या हवाली केला आहे.

अमरीश 23 सप्टेंबर 2005 रोजी शिखरावर तिरंगा फडकवून परतत होते. तेव्हा पाय घसरल्याने 4 सैनिक दरीत कोसळले होते. तीन सैनिकांचे मृतदेह त्याचवेळी हस्तगत झाले होते. तर बरोबर 16 वर्षांनी 23 सप्टेंबर 2021 रोजी चौथ्या सैनिकाचा मृतदेह हस्तगत झाला आहे.

Related Stories

संसर्गमुक्त आकडा 1 लाख पार

Patil_p

कृषी कायद्यांवर आज पुन्हा सुनावणी

Patil_p

‘त्या’ दहशतवाद्यांच्या अटकेनंतर मध्यप्रदेशात रेड अलर्ट

datta jadhav

66अ रद्द तरीही गुन्हय़ांची नोंद

Patil_p

वेतन देण्याचेही पैसे नाहीत : दिल्ली सरकार

Patil_p

कोरोना नियंत्रणासाठी त्वरित पावले उचला

Patil_p
error: Content is protected !!