तरुण भारत

ममतांच्या रोम दौऱ्याला केंद्र सरकारचा नकार

कोलकाता / वृत्तसंस्था

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रोम दौऱयावर जाण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी नाकारली आहे. ऑक्टोबर महिन्यात वेटिकन येथे होणाऱया विश्व शांती संमेलनात सहभागी होण्यासाठी ममता बॅनर्जींनी नियोजन सुरू केले होते. या संमेलनात जर्मनीच्या चान्सलर अँन्जेला मर्केल, पोप फ्रान्सिस आणि इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रगी हेसुद्धा सहभागी होणार आहेत. सदर शांती संमेलन मदर तेरेसा यांच्यावर आधारित असल्यामुळे ममता बॅनर्जीही तेथे उपस्थित राहण्यासाठी प्रयत्नशील होत्या. तथापि दौऱयाचे नियोजन सुरू असतानाच केंद्र सरकारने त्यांना रोमला जाण्यासाठी अनुमती देण्यास नकार दर्शवला.

Advertisements

Related Stories

सीबीएसई दहावी-बारावी परीक्षा 4 मे 2021 पासून

Patil_p

खात्मा केलेले दहशतवादी निघाले कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p

बेरोजगारी दर 7.5 टक्क्यांवर

Patil_p

कोरोनाच्या फैलावाची अमेरिकेकडून सखोल चौकशी

prashant_c

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 10,441 नवे कोरोना रुग्ण; 258 मृत्यू

Rohan_P

युपी : आणखी दोन दिवस वाढवले लॉकडाऊन!

Rohan_P
error: Content is protected !!