तरुण भारत

पंजाबचा हैदराबादवर निसटता विजय

पराभवाची मालिका खंडित, जेसॉन होल्डरचे अष्टपैलू योगदान निष्फळ

शारजाह / वृत्तसंस्था

Advertisements

हैदराबादच्या अष्टपैलू जेसॉन होल्डरने अष्टपैलू योगदान दिल्यानंतरही पंजाब किंग्सने आयपीएल साखळी सामन्यात अखेर शनिवारी आपली अपयशी मालिका खंडित केली. होल्डरने 19 धावातच 3 बळी घेतल्यानंतर हैदराबादने पंजाब किंग्सला 7 बाद 125 या माफक धावसंख्येवर रोखले. मात्र, प्रत्युत्तरात त्यांनाही 20 षटकात 7 बाद 120 धावांपर्यंतच मजल मारता आली. पंजाबचा संघ येथे 5 धावांनी विजयी ठरला.

विजयासाठी 126 धावांचे तुलनेने माफक आव्हान असताना सलामीवीर साहा (37 चेंडूत 31) व सातव्या स्थानावरील जेसॉन होल्डर (29 चेंडूत 5 षटकारांसह 47) यांनी आक्रमक फटकेबाजी केली. मात्र, तरीही हैदराबादचा संघ विजयापासून दूरच राहिला. पंजाबतर्फे रवी बिश्नोईने 24 धावात 3 तर शमीने 14 धावात 2 बळी घेतले.

प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर पंजाबचे फलंदाज सातत्याने झगडत राहिल्याचे दिसून आले. ख्रिस गेल व एडन मॅरक्रम यांनी 30 धावा जोडल्या, हीच पंजाबतर्फे सर्वोच्च भागीदारी ठरली. मॅरक्रमने 27 चेंडूत सर्वाधिक 32 धावांचे योगदान दिले.

कर्णधार केएल राहुलने यापूर्वी मागील लढतीत 49 धावांची आतषबाजी केली होती. येथे मात्र तो लवकर बाद झाला. त्याला होल्डरने डावातील पाचव्या षटकात 21 धावांवर बाद केले. सहकारी सलामीवीर मयांक अगरवाल देखील केवळ चारच चेंडूंच्या अंतराने मिडऑफवरील केन विल्यम्सनकडे सोपा झेल देत तंबूचा रस्ता धरला. हे दोन्ही बळी होल्डरने घेतले.

पंजाबचा संघ पॉवर प्ले अखेर 2 बाद 29 अशा स्थितीत होता. वॉर्नरला खलील अहमदच्या गोलंदाजीवर मॅरक्रमने जीवदान दिले. पण, वॉर्नर याचा फारसा लाभ घेऊ शकला नाही. ख्रिस गेलने (17 चेंडूत 14) आपले ट्रेडमार्क फटके खेळत उत्तम सुरुवात केली. पण, तो ही मोठी खेळी साकारण्यापूर्वीच बाद झाला. त्याला रशिद खानने पायचीत केले. निकोलस पूरनही (8) पुढील षटकात बाद झाला तर मॅरक्रमची आश्वासक खेळी 15 व्या षटकात संपुष्टात आली. दीपक हुडाने थोडीफार फटकेबाजी केली. मात्र, बदली खेळाडू जे. सुचितने अगदी हवेत झेपावत अप्रतिम झेल टिपला आणि त्याची खेळी संपुष्टात आणली. पंजाबने भुवनेश्वरच्या शेवटच्या षटकात 14 धावा जमवल्या आणि 20 षटकात 7 बाद 125 पर्यंत मजल मारली. हरप्रीत ब्रार 18 चेंडूत 18 धावांवर नाबाद राहिला.

धावफलक

पंजाब किंग्स ः केएल राहुल झे. बदली खेळाडू (जे. सुचित), गो. होल्डर 21 (21 चेंडूत 3 चौकार), मयांक अगरवाल झे. विल्यम्सन, गो. होल्डर 5 (6 चेंडू), ख्रिस गेल पायचीत गो. रशिद खान 14 (17 चेंडूत 1 चौकार), एडन मॅरक्रम झे. पांडे, गो. अब्दुल समद 27 (32 चेंडूत 2 चौकार), निकोलस पूरन झे. व गो. संदीप शर्मा 8 (4 चेंडूत 1 षटकार), दीपक हुडा झे. बदली खेळाडू (जे. सुचित), गो. होल्डर 13 (10 चेंडूत 1 चौकार), हरप्रीत ब्रार नाबाद 18 (18 चेंडूत 1 चौकार), नॅथन इलिस झे. पांडे, गो. कुमार 12 (12 चेंडूत 1 षटकार), मोहम्मद शमी नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 7. (बाईज 1, लेगबाईज 3, वाईड 3). एकूण 20 षटकात 7 बाद 125.

गडी बाद होण्याचा क्रम

1-26 (केएल राहुल, 4.1), 2-27 (मयांक, 4.5), 3-57 (गेल, 10.4), 4-66 (पूरन, 11.4), 5-88 (मॅरक्रम, 14.4), 6-96 (हुडा, 15.4), 7-118 (इलिस, 19.3).

गोलंदाजी

संदीप शर्मा 4-0-20-1, भुवनेश्वर कुमार 4-0-34-1, जेसॉन होल्डर 4-0-19-3, खलील अहमद 3-0-22-0, रशीद खान 4-0-17-1, अब्दुल समद 1-0-9-1.

सनरायजर्स हैदराबाद ः डेव्हिड वॉर्नर झे. राहुल, गो. शमी 2 (3 चेंडू), वृद्धिमान साहा धावचीत (अर्शदीप-रवी बिश्नोई) 31 (37 चेंडूत 1 चौकार), केन विल्यम्सन त्रि. गो. शमी 1 (6 चेंडू), मनीष पांडे त्रि. गो. बिश्नोई 13 (23 चेंडूत 1 चौकार), केदार जाधव त्रि. गो. बिश्नोई 12 (12 चेंडू), अब्दुल समद झे. गेल, गो. बिश्नोई 1 (2 चेंडू), जेसॉन होल्डर नाबाद 47 (29 चेंडूत 5 षटकार), रशिद खान झे. व गो. अर्शदीप 3 (4 चेंडू), भुवनेश्वर कुमार नाबाद 3 (4 चेंडू). अवांतर 7. (बाईज 1, लेगबाईज 2, वाईड 4). एकूण 20 षटकात 7 बाद 120.

गडी बाद होण्याचा क्रम

1-2 (वॉर्नर, 0.3), 2-10 (विल्यम्सन, 2.2), 3-32 (मनीष पांडे, 7..6), 4-56 (केदार, 12.2), 5-60 (समद, 12.6), 6-92 (साहा, 16.1), 7-105 (रशिद, 18.1).

गोलंदाजी

शमी 4-1-14-2, अर्शदीप 4-0-22-1, नॅथन इलिस 4-0-32-0, हरप्रीत ब्रार 4-0-25-0, रवी बिश्नोई 4-0-24-3.

Related Stories

भारतीय प्रशिक्षकासाठी ऑनलाईन सराव शिबीर

Patil_p

भारतीय पुरूष हॉकी संघाच्या विश्लेषण प्रशिक्षकपदी ग्रेग क्लार्क

Patil_p

हॉटेल रुमच्या ‘त्या’ वादात तथ्य नाही

Patil_p

एनबीए स्टार कोबी ब्रायंटचे अपघाती निधन

Patil_p

सायना, सिंधू उपांत्यपूर्व फेरीत गारद

Patil_p

एक पाऊल पुढे टाकण्याचे दिल्ली कॅपिटल्सचे ध्येय ः कैफ

Patil_p
error: Content is protected !!