तरुण भारत

नोकऱयांप्रश्नी जनतेच्या भावनांशी खेळू नका

मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांना ‘आप’चे खडे बोल

प्रतिनिधी/ पणजी

Advertisements

नोकऱयांसारख्या विषयावरून मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गोरगरीब जनतेच्या भावनांशी खेळू नये, तसेच खोटे बोलणे थांबवावे, असे आम आदमी पक्षाचे संयोजक राहुल म्हांबरे यांनी म्हटले आहे.

आपण केलेल्या बऱयाच घोषणा या अवाक्याबाहेरील आहेत व त्या प्रत्यक्षात उतरणे शक्य नाही, याची पूर्ण जाणीव असुनसुद्धा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गोमंतकीयांवर आश्वासनांचा वर्षाव करत आहेत. यावरून मुख्यमंत्री जे बोलतात ते करत नाहीत, हेच स्पष्ट होत आहे, अशी टीका आम आदमी पक्षाने केली आहे. 

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी नुकतेच प्रसारमाध्यमांशी बोलताना 30 नोव्हेंबरपर्यत सरकार 10 हजार जणांना नोकरी देणार असल्याचे सांगितले आहे. अशक्यप्राय अशी ही गोष्ट असून एवढय़ा अल्प कालावधित या नोकऱया सरकार कशा देईल याचे स्पष्टीकरण आपने मागितले आहे. सप्टेंबर संपत आला तरीही नोकऱयां संदर्भात कोणत्याही जाहिराती होत नाहीत. यावरून नोकरी संदर्भात मुख्यमंत्र्यांची घोषणा पुन्हा एकदा जुमला ठरेल, असे म्हांबरे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी या वर्षाच्या अखेरपर्यंत 10 हजार नव्हे तर किमान एक हजार तरी नोकऱया देऊन दाखवाव्या, असे आव्हान यापूर्वीच आपने सावंत यांना दिले होते. या नोकऱया सर्व कायदेशीर सोपस्कर पूर्ण करून देण्यात याव्या, अशी अट देखील घालण्यात आली आहे.

जिल्हा पंचायत निवडणुकीपासून मुख्यमंत्री सावंत गोमंतकीयांना 10 हजार नोकऱयांचे आश्वासन देत आहेत. पण त्या नोकऱया कुठे उपलब्ध आहेत? आणि त्या कशा देण्यात येतील असा सवाल म्हांबरे यांनी उपस्थित केला आहे.

कोविड महामारी दरम्यान स्वतःचा जीव धोक्मयात घालणाऱया 400 आरोग्य कर्मचाऱयांना मागील 5 महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याची टीका काही विरोधकांनी यापूर्वीच केली आहे. त्यावरून जे सरकार कोविड योद्ध्यांची सुद्धा अवहेलना करते ते सरकार 10 हजार जणांना नोकऱया कशा काय देणार, असेही म्हांबरे यांनी विचारले आहे.

गोरगरीब जनतेच्या पोटापाण्याचा प्रश्न असलेल्या नोकऱयांसारख्या विषयावरून मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी लोकांच्या भावनांशी खेळू नये, तसेच खोटे बोलणे थांबवावे. त्यापेक्षा वर्षाच्या अखेरपर्यंत किमान 1000 तरी नोकऱया देऊन दाखवाव्यात, असे म्हांबरे यांनी म्हटले आहे.

Related Stories

कवी परेश कामत यांना डॉ. टी. एम. ए. पै पुरस्कार जाहीर

Amit Kulkarni

आरोपींची खाती गोठविण्याचे आदेश

Patil_p

डिचोलीत कडकडीत लॉकडाऊन, व्यापाऱयांचा 100 टक्के सहभाग

Amit Kulkarni

नावेली जि. पं. पोट निवडणुकीत एडविन कार्दोज यांची हॅट्ट्रिक

Amit Kulkarni

प्राणीमित्रांच्या जागृतीमुळे नागांचे बळी घटले

Omkar B

पाण्यात अडकलेली वळवई-सुर्ला फेरीबोट पोचविली धक्यावर

Patil_p
error: Content is protected !!