तरुण भारत

राष्ट्रीय स्वयंसेवकाला बरोबर घेऊन जाण्याचे कार्य पं. दिनदयाळ उपाध्ये यांनी केले- श्रीपाद नाईक

प्रतिनिधी/ म्हापसा

राष्ट्रीय स्वयंसेवक हा बरोबर घेऊन जाण्याचे कार्य सदैव दिनदयाळ उपाध्यक्ष यांनी केले. आम्ही स्वातंत्र्य पेलण्याची ताकद आपल्या खांद्यावर नेऊ शकतो. यापैकी एक उपाध्यक्ष होते. संघ संस्कारांनी वाढलेले असे आपले जीवन देशासाठी आहे. हा देश व जीवन अबाधित राहायला पाहिजे तर पूर्ण काम करावे लागणार अशा विचारांनी प्रत्येक विषयात व वर्गात सदैव पहिला येण्याचा मान त्यांनी मिळविला. देश सुखी व्हायला काय करायला पाहिजे, देशाची अर्थव्यवस्था कशी आहे, सामान्य माणूस सुखी व्हायला पाहिजे, अन्न वस्त्र त्यांना मिळावे याकडे लक्ष दिले. स्व. दिनदयाळ उपाध्ये यांनी सदैव पाहिले आहे. अशी माहिती केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.

Advertisements

दिनदयाळ उपाध्ये यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त म्हापसा येथे पुष्पगुच्छ वाहून श्रद्धांजली वाहिल्यावर ते बोलत होते. यावेळी उत्तर गोवा अध्यक्ष महानंद अस्नोडकर, राजसिंग राणे, संदीप फळारी, रायन ब्रागांझा आदी मान्यवर उपस्थित होते. भाजप एक मोठे कुटुंब. ज्यांनी देशात हे घर करून ठेवले. यात चार महापुरुषही होऊन गेले. त्यात पं. दिनदयाळ उपाध्ये यांनी देशाला एक चांगले मार्गदर्शन करण्याचे कार्य केले. आम्ही कित्येक वर्षे पारतंत्र्यात राहिलो. स्वा. सैनिकाच्या बलीदानाने आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. ते टिकविण्याची कुवत आमच्याकडे आहे की नाही याचा विचार उपाध्ये यांनी सदैव केला.

उपाध्येची तत्त्व आम्ही जपली पाहिजे- संदीप फळारी

लहान वयातच त्यांच्यावर चांगले संस्कार झाले. जनसंघाची स्थापना करण्याचा झपाटा लावला. 52 वर्षांचे त्यांना आयुष्य लाभले. त्यांची तत्त्वे मुल्ले आम्ही थोडी तरी जपली, आत्मसात केली तरी आम्ही आमचा एक चांगला समाज घडवू शकतो. असे माजी नगरसेवक संदीप फळारी म्हणाले. स्वागत उत्तर गोवा अध्यक्ष महानंद अस्नोडकर तर आभार राजसींग राणे यांनी मानले.

Related Stories

आयएसएलमध्ये बांबोळीत आज जमशेदपूरचा सामना चेन्नईनशी

Amit Kulkarni

पद्मश्री, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार लॅम्बर्ट मास्कारेन्हास यांचे निधन

Amit Kulkarni

राज्यात पावसाची शक्यता

Patil_p

सत्तरीत काळी मीरी उत्पादनाला येणार चांगले दिवस

Patil_p

स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांना आदरांजली

Patil_p

दाबोळी विमानतळावर ‘डीव्हीओर’ कार्यान्वित

Amit Kulkarni
error: Content is protected !!