तरुण भारत

धारदार शस्त्राने महिलेचा खून

प्रतिनिधी/ कराड

येथील वाखाण परिसरात 35 वर्षीय महिलेचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. उज्ज्वला ठाणेकर (सध्या रा. वाखाण रोड, पाणीपुरवठा संस्थेसमोर, कराड मूळ रा. पेठ वडगाव, जि. कोल्हापूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. उज्ज्वलाच्या गळ्यावर वार करत तिच्या घराला बाहेरून कुलूप घालून हल्लेखोर पसार झाला आहे. या प्रकरणी सचिन बाळू निगडे (रा. मळाईनगर, मलकापूर, ता. कराड) याने कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. 

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्ज्वला ठाणेकर ही महिला गेल्या दोन वर्षांपासून पतीसोबत न राहता ती एकटीच कराडच्या वाखाण परिसरात भाडय़ाच्या खोलीत राहात होती. दरम्यान, उज्ज्वलाच्या बहिणीचे पती सचिन निगडे हे तिच्या घरी येत जात होते. उज्ज्वला एका खासगी रूग्णालयात काम करत होती तर कधी समारंभांमध्ये मदतनीस म्हणून जात होती. 24 सप्टेंबर रोजी शुक्रवारी उज्ज्वलाने सचिन निगडे यांना फोन करून दुपारी मैत्रिणीसमवेत कोरोना लस घ्यायला जाणार असल्याचे सांगितले.

  दरम्यान, शनिवारी सकाळी सचिन निगडे हा उज्ज्वलाच्या घरी गेला असता बाहेरून कुलूप लावलेले होते. शेजारील लोकांकडे विचारपूस केल्यावर ती दिसली नसल्याचे लोकांनी सांगितले. त्यानंतर उज्ज्वला ज्या मैत्रिणीसमवेत लस घ्यायला जाणार होती, त्या मैत्रिणीच्या घरी जाऊन सचिन यांनी विचारपूस केली. त्या मैत्रिणीने आम्ही शुक्रवारी दुपारी तीन वाजता लस घेऊन आपआपल्या घरी गेल्याचे सांगितले. सचिन यानी उज्ज्वलाच्या मैत्रिणीला सोबत घेऊन तिचा शोध घेत पुन्हा उज्ज्वलाच्या घराकडे आले. उज्ज्वलाच्या घराच्या खिडकीतून आत पाहिले असता आतील बाजूला रक्ताचे ठसे दिसले. सचिन यांनी आरडाओरडा केल्यानंतर तिथे लोक जमले. लोकांच्या मदतीने दगडाने कुलूप तोडून घरात प्रवेश केल्यावर किचनमध्ये उज्ज्वला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिचा खून झाल्याचे समोर आले.

  याबाबत पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे यांना सचिन निगडे यानी माहिती दिली. पोलीस उपअधीक्षक रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, साहाय्यक निरीक्षक अमित बाबर यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा सुरू केला. घटनास्थळावरील परिस्थितीवरून चौकशी सुरू केली. उज्ज्वलाचा खून नेमका कोणी केला? खुनाचे नेमके कारण काय? याचा शोध पोलीस करत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील तपास करत आहेत.

Related Stories

वॉर्डस्तरीय ‘कोविड-19’ टास्कफोर्स स्थापण्याची सूचना

Amit Kulkarni

जिल्हय़ातील जनतेला लस देण्यासाठी नियोजन करा

Amit Kulkarni

महाद्वार रोडवरील खडी वाहनधारकांना धोकादायक

Amit Kulkarni

मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये 43 कोरोनाबाधितांवर उपचार

Amit Kulkarni

एपीएल कार्डधारकांनाही रेशनचे धान्य द्या

Patil_p

सिद्धी महिला मंडळातर्फे दीपोत्सवाचे आयोजन

Omkar B
error: Content is protected !!