तरुण भारत

विकासकामे करण्यासाठी धमक लागते

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर टीका,

प्रतिनिधी/ वडूज

Advertisements

सातारा मेडिकल कॉलेजच्या मंजुरीनंतर बारामतीच्या मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली. पण आज ते कॉलेज पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहे. सातारचे कॉलेज अद्यापपर्यंत रखडले होते. सर्वसामान्य जनतेसाठी ठोस कामे करण्यासाठी पदाधिकाऱयांत चांगली धमक लागते. येथे येऱया गबाळ्याचे काम नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नाव न घेता केली.

वडूज येथील जम्बो कोव्हिड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, अमेरिकन इंडिया फाऊंडेशनचे समन्वयक मॅथ्यू जोसेफ, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, प्रभाकर देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, रणजितसिंह देशमुख, मानसिंगराव जगदाळे, सुरेंद्र गुदगे, नंदकुमार मोरे, सुभाषराव शिंदे, प्रा. अर्जुनराव खाडे, प्रा. बंडा गोडसे, संदिप मांडवे, जितेंद्र पवार, इंदिरा घार्गे, शशिकला देशमुख, जयश्री कदम, कविता म्हेत्रे, प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसिलदार किरण जमदाडे, प्रीती घार्गे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले, सातारा येथील शासकीय मेडीकल कॉलेजनंतर मंजूर झालेले बारामतीचे मेडीकल कॉलेज आज पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले आहे. त्यावेळी सातारचे मुख्यमंत्री असतानादेखील अद्याप मेडीकल कॉलेजचे काम रखडले आहे. अशी महत्वाची कामे मार्गी लावणे येऱया गबाळ्याचे काम नाही, अशी टिका त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता केली. 

कोरोनाचा प्रभाव अद्याप पूर्ण थांबला नाही. तिसरी लाट येण्यापूर्वीच शासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. अरोग्य यंत्रणेचे इन्फास्ट्रक्चर उभारताना निधीची कमतरता अजिबात भासू देणार नाही. सातारा जिह्यासाठी आरोग्य विभागास वाढीव दहा कोटींचा निधी दिला जाईल. सर्वांनी कोरोना नियमावलीचे पालन करावे. माण मतदार संघात चुकीचा उमेदवार निवडून दिल्याने विकासकामे मंदगतीने होत आहेत. वडूज नगरपंचायतीची इमारत हस्तांतरणाची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण केली जाईल. तर वडूज शहराच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठीही प्रशासनाने अद्यावत प्रस्ताव तयार करावा त्यास मंत्रालय पातळीवर तातडीने मंजूरी दिली जाईल. जिहे कठापूर योजनेचे श्रेय कोणीही घेत असले तरी ही योजना आपल्याच सहीने मंजूर झाली आहे. नजिकच्या काळात योजना गतीने कार्यान्वित केली जाईल. 

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी आत्तापर्यंत झालेले लसीकरण व अन्य तांत्रिक माहिती दिली.

प्रसाद जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संजय चिवटे यांनी आभार मानले. 

कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण, तेजस शिंदे, कल्पना खाडे, नगराध्यक्ष सुनिल गोडसे, उपनगराध्यक्षा किशोरी पाटील, सौ. शोभा माळी, सी. एम. पाटील, राजेंद्र चव्हाण, रविंद्र सानप, सुनिता कुंभार, अमोल वाघमारे आदी उपस्थित होते.

Related Stories

कोरोना चाचणी निगेटिव्ह; पालकमंत्री अधिवेशनासाठी रवाना

Patil_p

साताऱ्यात आज १६ डिस्चार्ज तर ५६१ नमुने पाठविले तपासणीला

triratna

सातारा : तुपेवाडीत (काढणे) एकाच कुटुंबातील ११ जण बाधित

datta jadhav

ढेबेवाडीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची जागेवरच कोरोना टेस्ट

triratna

अमेरिकेत बाधितांची संख्या 2 कोटींच्या उंबरठ्यावर

datta jadhav

ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीत संभ्रमावस्था

Patil_p
error: Content is protected !!