तरुण भारत

संस्कृत भाषेच्या विकासातूनच संस्कृतीची जपणूक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/ रत्नागिरी

Advertisements

संस्कृत भाषा ही माणूस म्हणून जगण्याची शिकवण देत़े  सध्याच्या युगात माता- बहिणींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आह़े  संस्कृती टिकवायची असेल तर संस्कृत भाषा जगविली पाहिज़े  संस्कृत भाषेच्या विकासातूनच आपल्या संस्कृतीची जपणूक हाईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल़े

  रामटेक येथील कवीकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी येथील उपकेंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्याहस्ते पार पडल़े छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणातील रत्नागिरीमध्ये या भाषेच्या जपणुकीसाठी एक महत्वाचे पाऊल कवीकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय उपकेंद्राच्या माध्यमातून पडत असल्याबद्दल ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. दूरदृष्यप्रणालीद्वारे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, रामटेकच्या संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलसचिव डॉ. हरेकृष्ण अगस्ती, कुलगुरु श्रीनिवास वरखेडी, रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

   मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, समाजामध्ये आज संस्कृत बोलणारी, समजणारी थोडीच माणसे शिल्लक आहेत़ विदेशातील लोक संस्कृत भाषेची जपणूक करत आहेत़  विशेषतः जर्मनीमध्ये संस्कृत शिकविले जाते. वेदांचा अभ्यास केला जातो, ही आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आह़े आपले वेद वाडःमय संस्कृतमध्ये आहे. ते समजून घेण्यासाठी या भाषेवर प्रभूत्व नाही मिळवता आले तरी किमान या भाषेचे किमान ज्ञान आपल्याला असायला हवे.

 पाठांतरापुरता संस्कृतचा विचार करून चालणार नाही

संस्कृत विषयाकडे हमखास गुण मिळवण्याचा विषय म्हणून पाहिले जाते. परंतु त्या पलिकडे जाऊन संस्कृत भाषा जपली आणि मनामनात जागवली गेली तर आपल्याला आपली संस्कृती कळेल व आपल्यावर चांगले संस्कार होतील. त्यामुळे  केवळ भाषांतर किंवा पाठांतरापुरता या भाषेचा विचार करून चालणार नाही तर या भाषेतील ज्ञान आणि संस्कार मनामनात बिंबवले गेले पाहिजेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

  उपकेंद्र सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद जिह्यात पैठण येथे स्थापन करण्यात आलेल्या संतपीठाचा तसेच चंद्रपूर येथे कार्यरत असलेल्या वन अकादमीचे वन विद्यापीठात रुपांतर करण्याच्या शासनाच्या प्रयत्नांचा येथे आवर्जून उल्लेख केला. त्यांनी संस्कृत विद्यापीठ व उपकेंद्राच्या भविष्यातील कामासाठी शासन त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही देत संस्कृत आणि संस्कृती जपण्यासाठी सर्व मिळून पुढाकार घेऊया, असे आवाहनही केले.

  यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, रामटेक येथील संस्कृत विद्यापीठाची सुरूवात ही युती शासनाच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने झाली होत़ी तर आज रत्नागिरी येथील उपकेंद्राची सुरूवातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते होत आह़े त्यामुळे एकप्रकारे हा सुवर्णक्षण असल्याचे सामंत यांनी सांगितल़े रत्नागिरीमध्ये लवकरच पीपीई मॉडेलवर रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा प्रयत्न असून मुख्यमंत्र्यांनी त्या प्रस्तावास मंजुरी द्यावी, अशी मागणी यावेळी सामंत यांनी केल़ी 

  कुलगुरु श्रीनिवास वरखेडी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी देशात 18 संस्कृत विद्यापीठे असून त्यापैकी एक महाराष्ट्रात रामटेक येथे असल्याची माहिती दिली.  ज्ञानदान, विकास आणि रोजगार संधींची उपलब्धता करून देणारे हे संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र समाजउपयोगी संसाधनांच्या निर्मितीसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. संस्कृत विद्यापीठाची पुणे, परभणी, जळगाव व ठाणे येथे भविष्यात उपकेंद्रे स्थापन करण्याचे नियोजित असून त्यास शासनाने सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंडय़ा साळवी, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्य जोत्स्ना ठाकूर, कुलसचिव डॉ. हरेकृष्ण अगस्ती, वित्त व लेखा अधिकारी रामचंद्र जोशी आदी उपस्थित होत़े

             मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना काढला चिमटा

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या सुरूवातीला सांगितले की, संस्कृतचा कार्यक्रम असल्याने माझी पंचाईत झाली होत़ी  सुरूवातीला दोन वाक्य त्या भाषेत बोलायची. नंतर राम राम म्हणत भाषणाला सुरूवात करायच़ी अशी नाटकं मला कधी जमली नाहीत, असे बोलून मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी ज्याप्रमाणे विविध प्रदेशात जावून भाषणाची सुरूवात स्थानिक भाषेत करतात, त्यासंबंधी अप्रत्यक्षपणे चिमटा काढल़ा

Related Stories

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी विनापास येणाऱ्या चाकरमान्यांना प्रवेश नाही

triratna

अपघातग्रस्त डबे हटवण्याचे काम युध्दपातळीवर

Patil_p

लोटेतील श्री पुष्कर कंपनीत वायू गळती

Amit Kulkarni

दापोलीतील विद्यार्थी ‘विद्ये’साठी रानमाळावर!

Patil_p

खेड नगर परिषद डिझेल घोटाळा, फौजदारी गुन्हा दाखल होणार!

Patil_p

रत्नागिरीतील नेवरे गावी फासकीत अडकलेल्या बिबट्याची सुखरूप केली सुटका

triratna
error: Content is protected !!