तरुण भारत

मंगसुळी खंडोबा मंदिर दर्शनासाठी खुले

वार्ताहर/ मंगसुळी

कर्नाटक-महाराष्ट्रासह सीमाभागातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱया मंगसुळी येथील जागृत खंडोबा मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. यामुळे मंगसुळीसह परिसरातील भाविक व व्यापारीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

Advertisements

कोरोना संसर्गामुळे गत सहा महिन्यांपासून खंडोबा मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. तसेच भाविक वर्गातून मंदिर खुले करण्यासाठी मागणी होत होती. याची दखल घेत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी मंदिर खुले करण्याचा आदेश नुकताच दिला. या आदेशानुसार तहसीलदार आर. आर. बुर्ली यांच्या उपस्थितीत माजी जि. पं. सदस्य रवींद्र पुजारी व भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करून मंदिराचा दरवाजा खुला करण्यात आला.

यावेळी तहसीलदार बुर्ली यांनी कोरोना नियमावलीचे पालन करून पुजारीवर्गाने भाविकांना मंदिरात प्रवेश देताना सॅनिटायझरचा वापर करावा, मास्क वापरणे, सामाजिक अंतराचे पालन करणे याची खबरदारी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन केले. पालखी सोहळा, सासनकाठी, जागर, होम, अश्व सोहळा, लग्न समारंभ इत्यादीसह अन्य धार्मिक कार्यक्रमात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.

यावेळी रवींद्र पुजारी यांनीही मनोगत व्यक्त केले. रवींद्र पुजारी यांच्या हस्ते तहसीलदार बुर्ली यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तलाठी पी. एस. कांबळे, रवींद्र पुजारी, बाळासाहेब पाटील, धनाजी पाटील, संजय तळवळकर, चिदानंद मगदूम, भरत माळी, श्रीकांत पुजारी, प्रशांत पाटील, आप्पासाहेब पुजारी, हिंमत इनामदार, बाळकृष्ण बजंत्री यांच्यासह पुजारी व भाविक उपस्थित होते.

Related Stories

महाविद्यालये सुरू करण्याबाबत संभ्रम कायम

Patil_p

सामाजिक अंतर राखत साजरी झाली बकरी ईद

Patil_p

वनक्षेत्र वाढविण्यासाठी वनखात्याची धडपड

Omkar B

औद्योगिक कामगारांची पोलिसांकडून अडवणूक

Amit Kulkarni

बस पास मोफत द्या

Amit Kulkarni

नंदिहळ्ळी ग्रा. पं. अध्यक्षपदी निंगव्वा कुरबर यांची निवड

Amit Kulkarni
error: Content is protected !!