तरुण भारत

मुख्यमंत्र्यांच्या दौऱयामुळे शहरातील स्वच्छतेसाठी धडपड

प्रतिनिधी/ बेळगाव

मुख्यमंत्री बसवराज बोम्माई बेळगाव दौऱयावर येत आहेत. त्यामुळे शहरातील स्वच्छता करण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱयांना जुंपण्यात आले आहे. एरवी सर्वत्र मातीचे ढीग आणि कचऱयाचे साम्राज्य पसरलेले असते. मात्र, मुख्यमंत्री येणार म्हटल्यावर शहराची स्वच्छता करण्यास सुरुवात झाली आहे. याबद्दल सर्वसामान्य जनतेतून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Advertisements

स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील कामे अत्यंत संथगतीने सुरू आहेत. ही कामे तातडीने करावीत, यासाठी अनेकवेळा विविध संघटनांनी निवेदने दिली. या कामांमुळे काही जणांचा बळीही गेला आहे. मात्र ही कामे पूर्ण करण्यास कोणत्याच हालचाली करण्यात आल्या नाहीत. मात्र, आता मुख्यमंत्री येत आहेत म्हणून सर्वत्र स्वच्छता करण्यासाठी महापालिकेचे आणि स्मार्ट सिटीचे अधिकारी कामाला लागले आहेत.

मंत्री येताच दसरा आणि दिवाळी साजरी करायची काय? असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत आहे. गोवावेस सर्कलजवळ कचऱयाचे ढीग होते. एक खड्डाही बऱयाच दिवसांपासून तसाच होता. पावसाळय़ातही त्या खड्डय़ाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र, आता मुख्यमंत्री येत आहेत म्हणून तो खड्डा बुजविण्यात आला आहे. एकूणच मंत्रिमहोदय येताच शहरातील स्वच्छता होत आहे. त्यामुळे दररोज एखादा मंत्री बेळगावला यावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेतून होत आहे. 

Related Stories

मंडोळी हायस्कूलमध्ये अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन

Amit Kulkarni

मनपा आयुक्तांकडून विविध विकासकामांची पाहणी

Patil_p

शहराला जलवाहिन्यांच्या गळतीचे ग्रहण

Patil_p

कोगनोळी नाक्यावरील चार पोलिसांना कोरोना

Patil_p

शेतकऱयांची जीवनदायिनी मुंगेत्री नदीचे अस्तित्व धोक्यात

Amit Kulkarni

परिवहनची चाके हळूहळू रूळावर

Patil_p
error: Content is protected !!