तरुण भारत

कोल्हापूरला येणारच, हिम्मत असेल तर अडवून दाखवा, किरीट सोमय्यांचं राष्ट्रवादीला आव्हान

मुंबई/प्रतिनिधी

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif Minister) यांच्यावर एकामागोमाग एक भ्रष्टाचाराचे आरोप करत सुटलेले भाजप नेते किरीट सोमय्या मंगळवारी पुन्हा कोल्हापूरला येणार आहेत. सोमय्या यांनी येत्या मंगळवारी कोल्हापुरात येऊन अंबाबाईचे दर्शन घेणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या दौऱ्यावरून पुन्हा एकदा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या कोल्हापूर दौऱ्यावरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. सामनाच्या रोखठोक सदरातून विरोधकांची हास्यजत्रा या मथळ्यातून संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांच्या दौऱ्याचा समाचार घेतला. यावर ‘हिम्मत असेल तर उद्यापासून सुरु होणारा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा’ असं आव्हान किरीट सोमय्या यांनी दिलंय. जर किरीट सोमय्याची हास्य जत्रा आहे किंवा विरोधी पक्षातच जोर नाही, मग सामनामधून किरीट सोमय्याची दखल का घेता? असा सवालही त्यांनी केला आहे.

दरम्यान, अनिल परब (Anil Parab), अनिल देशमुख (Anil Deshmukh) अशा सत्ताधारी मंत्र्यांनंतर आता किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वळवला आहे. त्यांनी मुश्रिफांवर १२७ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. किरीट सोमय्या सोमवारी कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर येणार होते. दौऱ्यावेळी ते मुश्रीफांच्या साखर कारखान्याची पाहणी करणार होते. पण कायदा व सुव्यवस्थेच्या कारणासाठी कोल्हापूर दौरा रद्द केल्याने संतापलेल्या किरीट सोमय्या यांनी कराड इथं पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या पुढच्या कामाची दिशा होती. त्यांनतर सोमय्यांनी एका पत्रकार परिषदेत आपण कोल्हापूरला जाणार असून कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शनही (Kolhapur Ambabai Temple) घेणार असल्याचे म्हंटले आहे. यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले असून या कार्यकर्त्यांना मुश्रीफांनी सोमय्यांना शांतेने दौरा करू द्या असे आवाहन केले आहे.

किरीट सोमय्यांची कोल्हापूर दौऱ्यात अडवणूक करणं गैर आहे, असं शरद पवार (Sharad Pawar) स्वत: बोलतात. सरकारला सांगावे लागते की दौरा अडवला याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाला नव्हती. हे अत्यंत चुकीचं असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला. किरीट सोमय्यांचा दौरा सरकारला का अडवावा लागतो. हे सगळं सरकार का करतंय? असे एक ना अनेक सवाल किरीट सोमय्यांनी यावेळी उपस्थित केले.

उद्यापासून मुंबई प्रभादेवी (mumbai prabhadevi temple) येथून सोमय्या आपल्या कोल्हापूर दौऱ्याला प्रारंभ करतील. या दौऱ्यात कोल्हापूरमधील मुरगुड, कागल, इथे भेट देण्याचा सोमय्यांचा मानस आहे. कोल्हापूर पोलीस स्टेशनला हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तिसऱ्या घोटाळ्याविरोधात सोमय्या तक्रार दाखल करणार आहे. यावेळी सोमय्यांबरोबर भाजप नेत्यांची फौज असणार आहे. कोल्हापूर दौऱ्यामध्ये विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, अशिष शेलार आणि गोपाळ शेट्टी सोमय्यांबरोबर असतील.

Advertisements

कोल्हापूर दौऱ्याविषयी काय म्हणाले होते किरीट सोमय्या… यासाठी येथे क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातमी

Related Stories

…तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते : WHO

datta jadhav

कोल्हापूर : आंबा परिसराचा पर्यटन विकास आराखड्यात समावेश करणार : खासदार माने

Abhijeet Shinde

आरटीई प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ अद्यापही सुरुच

Patil_p

सिक्कीम, बिहार आणि आसाममध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Rohan_P

शिंगणापूर बंधाऱ्यावर दुचाकी घसरुण एकजण गेला वाहून, शोध सुरू

Abhijeet Shinde

यशस्वी मध्यस्थीनंतर कमांडोची सुटका

Amit Kulkarni
error: Content is protected !!