तरुण भारत

बॉक्सर, पोलीस अधिकारी अन् मॉडेल

सिक्कीममधील युवतीचा अनोखा प्रवास

महिलांसाठी काहीच अशक्य नाही याचा जिवंत पुरावा म्हणजे सिक्कीममधील युवती इक्षा हैंग सुब्बा उर्फ इक्षा केरुंग आहे. एक पोलीस अधिकारी असण्यासह ती राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सर, बाइक राइडर आणि सुपरमॉडेल देखील आहे. अलिकडेच तिने ‘एमटीव्ही सुपर मॉडेल ऑफ द ईयर सीझन 2’ या टीव्ही रिएलिटी शोमध्ये पहिल्या 9 स्पर्धकांमध्ये स्थान मिळविले आहे. या सीझनची विजेती होत ‘सुपर मॉडेल ऑफ द ईयर’चा मान मिळविते की नाही हे आता पहावे लागणार आहे.

Advertisements

इक्षा 2019 मध्ये सिक्कीम पोलीस दलात दाखल झाली. पण तिला नेहमीच मॉडेलिंगचा छंद राहिला आहे. याच छंदामुळे ती एमटीव्ही सुपर मॉडेल या व्यासपीठापर्यंत पोहोचली आहे. शोमध्ये तिने स्वतःची ओळख सांगितली असता परीक्षकांमध्ये सामील मलाइका अरोराने इक्षाला स्टँडिंग ओवेशन देत अशा महिलांना सॅल्युट करण्याची गरज असल्याचे म्हटले होते.

19 वर्षे वय असताना ती पोलीस दलात सामील झाली होती. सध्या ती एक पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असून या नोकरीबद्दल तिला प्रेम आहे. तत्पूर्वी इक्षा राष्ट्रीय पातळीवरील बॉक्सर राहिली असून तिला बाइक चालविणे प्रचंड आवडते. एक सुपरमॉडेल होण्याचे तिचे स्वप्न आहे.

महिलांसाठी प्रेरणा

स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडत विविध क्षेत्रांमध्ये स्वतःचा ठसा उमटवू पाहणाऱया महिलांसाठी इक्षा खऱया अर्थाने प्रेरणादायी आहे. इक्षाला इन्स्टाग्रामवर 15 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात. एक पोलीस कर्मचारी, सुपरमॉडेल, बॉक्सर, बाइक राइडर आणि हाइकर असे तिने स्वतःच्या बायोमध्ये नमूद केले आहे.

Related Stories

मच्छीमारांच्या कर्जमाफीची रक्कम अर्थखात्याकडून मंजूर

Patil_p

सणासुदीच्या काळात खबरदारी घ्यावी !

Amit Kulkarni

घरातही करा मास्कचा वापर

triratna

शेतात जाण्यासाठी हवं हेलिकॉप्टर…

Patil_p

हिमाचल प्रदेश : बिलासपुरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Rohan_P

देशव्यापी एनआरसीचा निर्णय नाही

Amit Kulkarni
error: Content is protected !!