तरुण भारत

शाळेतील अनोखे ग्रॉसरी स्टोअर

स्टोअरमध्ये मुले आणून ठेवतात सामग्री गरीब मित्रांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात हा हेतू

अमेरिकेच्या अटलांटा शहरातील एका हायस्कुलमध्ये अलिकडेच एक ग्रॉसरी स्टोअर उघडण्यात आले आहे. येथील फ्रिजमध्ये मासे, चिकन, पिझ्झा आणि बर्गरपासून मुलांसाठी आवश्यक असलेली सर्व सामग्री उपलब्ध आहे. येथे ब्रँडेड कपडे आणि बूट देखील ठेवण्यात आले आहेत. कुटुंबाची आर्थिक स्थिती फारशी बरी नसलेली किंवा ज्या कुटुंबांमध्ये मुलांना महागडी सामग्री मिळवून देण्याची क्षमता नाही अशा मुलांना येथे ठेवण्यात आलेली सर्व सामग्री मोफत देण्यात येत आहे.

Advertisements

मिनी वॉलमार्ट

शाळेच्या मुख्याध्यापिका जॉन मॅडन याला मिनी वॉलमार्ट या नावाने संबोधित आहेत. अमेरिकेत सुमारे 17 लाख मुले उपासमारीला तोंड देत आहेत. अशा स्थितीत महामारीने लोकांची आर्थिक स्थिती अधिकच बिघडवून टाकली आहे. अनेक कुटुंबांना मुलांच्या सामान्य गरजा देखील पूर्ण करता येत नसल्याची स्थिती आहे. या गोष्टी विचारात घेत हे स्टोअर सुरू करण्यात आल्याची माहिती मॅडन यांनी दिली आहे.

मुलांचाही हातभार

येथे मुलांच्या गरजेची पूर्ण सामग्री आहे. स्टोअरचे वैशिष्टय़ म्हणजे येथे ठेवण्यात आलेल्या सामग्रीचा पुरवठा शाळेकडून होतो. तसेच काही मुले स्वतःच्या मित्रांच्या मदतीसाठी आवश्यक सामग्री आणतात आणि स्टोअरमध्ये ठेवतात. यामुळे शाळेत शिकणाऱया गरीब मुलांच्या गरजा पूर्ण होतात.

Related Stories

रशियातील युद्धाभ्यासात भारत सामील

Amit Kulkarni

टीकोप्लेनिन : कोरोनावर 10 पट अधिक प्रभावी औषध

Patil_p

वर्ल्ड अर्थ डे आज

Patil_p

कोरोना संकट : अमेरिकेच्या लोकसंख्येत नीचांकी वृद्धी

Omkar B

विरोधानंतर दिलासा

Patil_p

रशिया-पाकिस्तानमध्ये होतोय पाचवा सैन्य अभ्यास

datta jadhav
error: Content is protected !!