तरुण भारत

अमेरिकेत रेल्वे दुर्घटना, 3 जणांचा मृत्यू

मोंटानामध्ये रुळावरून घसरले रेल्वेचे 7 डबे – 50 हून अधिक जण जखमी

वृत्तसंस्था / मोंटाना

Advertisements

अमेरिकेच्या मोंटाना प्रांतात शनिवारी एक रेल्वे रुळावरून घसरली आहे. या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वेतून 147 नागरिक आणि चालक दलाचे 13 सदस्य प्रवास करत होते.

सिएटलपासून शिकागोदरम्यान धावणारी द एम्पायर बिल्डर ट्रेन सेंट्रल मोंटानामध्ये संध्याकाळी 4 वाजता (अमेरिकेतील प्रमाणवेळेनुसार) रुळावरून घसरली आहे. रेल्वेचे 2 इंजिन आणि 10 डब्यांपैकी 7 डबे रुळांवरून घसरले आहेत अशी माहिती एमट्रक या रेल्वे ऑपरेटरने दिली आहे.

ही दुर्घटना हेलेनापासून सुमारे 150 मैल (241 किलोमीटर) आणि कॅनडाला लागून असलेल्या सीमेपासून सुमारे 30 मैल (48 किलोमीटर) अंतरावर झाली आहे. एमटॅक स्थानिक अधिकाऱयांसोबत जखमी प्रवाशांना हलविण्यासाठी आणि अन्य सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी काम करत आहे. राष्ट्रीय परिवहन सुरक्षा बोर्ड दुर्घटनेच्या चौकशीसाठी तपासकर्ते आणि रेल्वे सिग्नल तज्ञांसह 14 सदस्यीय पथक पाठविणार असल्याची माहिती कंपनीचे प्रवक्ते एरिक वीस यांनी दिली आहे.

Related Stories

म्यानमारमध्ये भूस्खलन; 162 जणांचा मृत्यू

datta jadhav

अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या दीड लाखाच्या उंबरठ्यावर

datta jadhav

व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ सल्लागारपदी नीरा टंडन यांची नियुक्ती

Patil_p

भारताने नेपाळला पाठवली 23 टन औषधे

prashant_c

धूम्रपान सोडण्यासाठी डोकं पिंजऱयात कैद

Patil_p

निर्बंध शिथील होणार

Patil_p
error: Content is protected !!