तरुण भारत

13 वर्षांनी काश्मीरमध्ये एअर शो

काश्मीर खोऱयात वायुदलाकडून सामर्थ्याची प्रचिती

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisements

भारतीय वायुदलाकडून श्रीनगरमध्ये रविवारी एअर शोचे आयोजन करण्यात आले. या एअर शोमध्ये स्काय डायव्हिंग टीम आकाशगंगा, सूर्यकिरण एरोबॅटिक अणि डिस्प्ले टीमने डल सरोवरावरील आकाशात स्वतःच्या हवाई कौशल्याचे दर्शन घडविले आहे. काश्मीर खोऱयात 13 वर्षांनी एअर शोचे आयोजन करण्यात आले आहे. या एअर शोमध्ये वायुदलाच्या सिम्फोनिक ऑर्केस्ट्राने देखील भाग घेतला आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारंभांच्या अंतर्गत एअर शोचे आयोजन श्रीनगर वायुतळ आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून करण्यात आले. एअर शोची थीम ‘गिव्ह विंग्स टू यॉर ड्रीम’ अशी होती. याचा उद्देश खोऱयातील तरुणाईला वायुदलात दाखल होण्यासाठी प्रेरित करणे तसेच पर्यटनाला चालना देणे होता अशी माहिती वायुदलाच्या अधिकाऱयांनी दिली आहे.

जम्मू-काश्मीरच्या शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरमध्ये या एअर शोचे आयोजन करण्यात आले. यात उपराज्यपाल मनोज सिन्हा, वेस्टर्न एअर कमांडचे ऑफिसर कमांडिंग इन चीफ बी.आर. कृष्णा यांच्यासह अनेक अधिकारी सामील झाले. तसेच 3 हजारांहून अधिक महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला आहे.

सूर्यकिरण एरोबेटिक डिस्प्ले टीम ‘आयएएफ के राजदूत’ने 13 वर्षांच्या कालखंडानंतर खोऱयात हवाई कौशल्याची प्रचिती घडवून आणली आहे. या एअर शोमध्ये वायुदलाच्या विविध विमानांचा फ्लायपास्ट सामील झाला. प्रेक्षकांनी पॅरा-मोटर उड्डाण आणि वायुदलाच्या स्काय डायव्हिंग टीम ‘आकाशगंगे’चे कौशल्यही अनुभवले आहे.

Related Stories

बदल घडवून आणण्याची हीच वेळ

tarunbharat

यूपीएससी परीक्षेची तारीख जाहीर

datta jadhav

स्फोट, गोळीबार घटनांनी जम्मू काश्मीरमध्ये दहशत

Amit Kulkarni

‘मध्यान्ह’चे पैसे विद्यार्थ्यांच्या थेट बँकखात्यात जमा होणार

Patil_p

सिंधियांना मिळणार रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी?

datta jadhav

विध्वंसक ड्रोनचे तंत्रज्ञान चीनच्या हाती

Patil_p
error: Content is protected !!