तरुण भारत

‘पैंजण तुझं’ हे रोमँटिक कोळीगीत वाजणार

सध्या नवनवीन रोमँटिक गीतांनी तरुणाईला भुरळ पाडली आहे. एकामागोमाग एक आलेल्या दिलबहार गाण्यांनी रसिक प्रेक्षकांना बेधुंद करून सोडले आहे. यातच भर घालत एक रोमँटिक कोळीगीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाले आहे. डान्सिंग गर्ल म्हणून व्हायरल झालेली सलोनी सातपुते आणि डीआयडी फेम दीपक हुलसुरे ‘पैंजण तुझं’ या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. पीबीए म्युझिक अंतर्गत असलेले हे कोळीगीत प्रेक्षकांनाही थिरकायला लावणार यांत शंकाच नाही. पीबीए म्युझिकने या आधीही ‘विठ्ठला विठ्ठला’, ‘नखरा’, ‘हे गणराया’ या गाण्यातून प्रेक्षकांची मने जिंकली होती यात भर घालत पीबीए म्युझिकचे ‘पैंजण तुझं’ हे नवे रोमँटिक कोळीगीतही प्रेक्षकांना ठेका धरायला लावण्यास सज्ज झाले आहे.

प्रेयसीच्या पैंजणाच्या आवाजावर प्रियकराने नकळतपणे धरलेल्या ठेक्याचे वर्णन या पैंजण तुझं या कोळीगीतातून केले आहे. या गाण्याला अभि-राम यांनी संगीत दिले असून गाण्याचे बोल अक्षय जोशी लिखित आहेत तर हे गाणे प्रेम धीरल याने गाऊन या कोळीगीताला चारचाँदच लावले आहेत. या गाण्याच्या दिग्दर्शनाची धुरा मुकुंद राऊत याने पेलवली असून क्रिएटिव्ह हेड म्हणून वैभव लोंढे याने उत्तम कामगिरी पार पाडली आहे. निर्माते अँजेला आणि तेजस भालेराव यांच्या पीबीए फिल्म्स अँड म्युझिक  निर्मित हे गाणे कोरोना काळात डान्सिंग गर्ल म्हणून व्हायरल झालेल्या सलोनी सातपुते आणि डीआयडी फेम दीपक हुलसुरे यांच्या नृत्याने सजले आहे. कोळी गीतांची धमाल या गाण्यातून नक्की अनुभवायला मिळणार आहे. या गाण्यात सलोनीचा हॉट लूक पाहायला मिळणार असून चाहते तिच्या या लूकला आणि तिच्या दमदार नृत्याला नक्कीच भरभरून प्रतिसाद देतील आणि तिचा हा दमदार परफॉर्मन्स पाहणे प्रेक्षकांनाही रंजक ठरेल.

Advertisements

Related Stories

आमिरसोबत काम करणार नागार्जुनचा पुत्र

Patil_p

उर्वशी रौतेलाला युएईचा गोल्डन व्हिसा

Patil_p

म्हणून विराजसचा निबंध ठरला वेगळा

Patil_p

सूर्यनमस्कारांच्या मदतीने फिटनेस राखतेय सोनाली कुलकर्णी

Patil_p

विक्की कौशल अन् कॅटरिना रिलेशनशिपमध्ये

Patil_p

सुष्मिताने पूर्ण केले ‘आर्या 2’चे शूटिंग

Amit Kulkarni
error: Content is protected !!