तरुण भारत

सॅफ फुटबॉल स्पर्धेसाठी 23 खेळाडू जाहीर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मालदीवमध्ये होणाऱया आगामी सॅफ फुटबॉल स्पर्धेसाठी प्रमुख प्रशिक्षक स्टिमॅक यांनी रविवारी 23 जणांच्या भारतीय फुटबॉल संघाची घोषणा केली असून बेंगळूर एफसी संघातील विंगर उदांता सिंगचे  पुनरागमन झाले आहे.

Advertisements

चालू महिन्याच्या प्रारंभी झालेल्या नेपाळ विरूद्धच्या दोन आंतरराष्ट्रीय मित्रत्वाच्या सामन्यात उदांता सिंगला सहभागी होता आले नव्हते. मालदीवमधील ही स्पर्धा 1 ते 16 ऑक्टोबर दरम्यान खेळविली जाणार आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या 23 जणांच्या भारतीय फुटबॉल संघामध्ये चेन्नीयन संघाचा गोलरक्षक विशाल कैतचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आणखी दोन गोलरक्षकांना या स्पर्धेसाठी संधी देण्यात आली आहे. आकाश मिश्रा, बिपिन सिंग आणि प्रणॉय हलदार यांना मात्र वगळण्यात आले आहे. भारतीय फुटबॉल संघाने आतापर्यंत सॅफ फुटबॉल स्पर्धा सातवेळा जिंकली आहे. लाहोरमध्ये 1993 साली, काटमांडूमध्ये 1997 साली, मंडगावमध्ये 1999 साली, कराचीमध्ये 2005 साली, ढाक्कामध्ये 2009 साली, नवी दिल्ली 2011 साली आणि थिरूवनंतपुरम् येथे 2015-16 साली भारतीय फुटबॉल संघाने या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते.

मालदीवमध्ये होणाऱया सॅफ फुटबॉल स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना बांगलादेश बरोबर 4 ऑक्टोबरला, दुसरा सामना 7 ऑक्टोबरला लंकेबरोबर, तिसरा सामना 10 ऑक्टोबरला नेपाळ बरोबर तर चौथा सामना 13 ऑक्टोबरला मालदीव बरोबर होणार आहे.

भारतीय फुटबॉल संघ – गोलरक्षक- गुरूप्रित सिंग, अमरिंदर सिंग, विशाल कैत, बचाव फळी- प्रितम कोटल, एस. फर्नांडीस, चिंगलेसेना सिंग, राहुल भेके, सुभाषीस बोस, मंदार देसाई, मध्यफळी- उदांता सिंग, बेंडॉन फर्नांडीस, लालेंगमेवाया, अनिरूद्ध थापा, अब्दुल समाद, जेक्सन सिंग, मार्टीन्स, सुरेश सिंग, कोलॅको आणि यासीर मोहम्मद.

Related Stories

वानखेडे स्टेडियमवर रात्री 8 नंतर सरावाची मुभा

Patil_p

फातोडर्य़ात आज रंगणार एफसी गोवा-जमशेदपूर संघात लढत

Omkar B

ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेतून अँडी मरेची माघार

Patil_p

चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये चेल्सीला विजेतेपद

Patil_p

दक्षिण कोरियाकडे एएफसी चषक फुटबॉलचे जेतेपद

Patil_p

खो-खो खेळाडूंना पुन्हा अर्जुन पुरस्काराची प्रतीक्षा!

Patil_p
error: Content is protected !!