तरुण भारत

बिग बॅश स्पर्धेत मंदाना, दिप्ती खेळणार

वृत्तसंस्था/ सिडनी

ऑस्ट्रेलियात पुढील महिन्यात सुरू होणाऱया महिलांच्या सातव्या टी-20 बिग बॅश क्रिकेट स्पर्धेत भारताच्या स्मृती मंदाना आणि दिप्ती शर्मा विद्यमान विजेत्या सिडनी थंडर संघाकडून खेळणार आहेत.

Advertisements

सध्या भारतीय महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर आहे. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश महिलांची टी-20 क्रिकेट स्पर्धा 14 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया स्पर्धेत 25 वर्षीय स्मृती मंदाना तसेच अष्टपैलू दिप्ती शर्मा पुन्हा दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. मंदानाची फलंदाजी सध्या बहरत असल्याचे दिसून येते. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱया वनडे सामन्यात मंदानाने 94 चेंडूत 86 धावा जमविल्या होत्या. दिप्ती शर्मा पहिल्यांदाच महिलांच्या बिग बॅश लीग स्पर्धेत खेळणार आहे. मंदानाने यापूर्वी या स्पर्धेत होबार्ट हुरीकेन्स आणि ब्रिस्बेन हिट संघाचे प्रतिनिधीत्व केले होते.

Related Stories

भारतीय नेमबाज 16 जुलैला टोकियोला प्रयाण

Amit Kulkarni

विंडीज कसोटी संघाच्या कर्णधारपदी ब्रेथवेट

Patil_p

बावेलीच्या खेळाडूंचे जयपूर युथ गेम्स चॅम्पियनशिपमध्ये घवघवीत यश

Abhijeet Shinde

टेनिसपटूंना मिळणार आयटीएफची आर्थिक मदत

Patil_p

‘खेलरत्न’ पुरस्कारांसाठी निरज चोप्राची शिफारस

Patil_p

फुटबॉल संघांच्या शिबिरासाठी गोव्याची निवड

Patil_p
error: Content is protected !!