तरुण भारत

शेवटच्या चेंडूवर चेन्नईचा विजय

केकेआरवर 2 गडय़ांनी मात, सामनावीर जडेजाची फटकेबाजी ठरली निर्णायक

वृत्तसंस्था/ अबु धाबी

Advertisements

सामनावीर रवींद्र जडेजाने फटकावलेल्या 8 चेंडूतील 22 धावांमुळे चेन्नई सुपरकिंग्सने येथे झालेल्या आयपीएल साखळी सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर शेवटच्या चेंडूवर रोमांचक विजय मिळवित दोन गडय़ांनी मात केली. या विजयानंतर चेन्नईने 16 गुणांसह पुन्हा आघाडीचे स्थान मिळविले आहे. केकेआर 8 गुणांसह चौथ्या स्थानावर कायम आहे.

केकेआरने प्रथम फलंदाजी करीत निर्धारित 20 षटकांत 6 बाद 171 धावा जमविल्या. त्यानंतर चेन्नईने 20 षटकांत 8 बाद 172 धावा जमवित विजय साकार केला. 172 धावांचा पाठलाग करताना चेन्नईच्या आघाडीच्या फलंदाजांनी बऱयापैकी योगदान दिले. पण अखेरच्या टप्प्यात त्यांची गाडी रूळावर घसरली होती. मात्र जडेजाने 8 चेंडूत 22 धावा तडकावत संघाला रोमांचक विजय मिळवून दिला. फॅफ डय़ु प्लेसिस (43), ऋतुराज गायकवाड (40), मोईन अली (32) यांनीही उपयुक्त धावा जमविल्या. शेवटच्या षटकात 6 धावांची गरज असताना करण पहिल्या चेंडूवर बाद झाल्यानंतर शार्दुलने तिसऱया चेंडूवर 3 धावा काढल्या. पाचव्या चेंडूवर सुनीलने जडेजाला पायचीत केले. पण शेवटच्या चेंडूवर चहरने एक धाव घेत चेन्नईचा विजय साकार केला.

राणा, दिनेशची फटकेबाजी

तत्पूर्वी, केकेआरने 20 षटकांत 6 बाद 171 धावा जमविल्या होत्या. राहुल त्रिपाठीने 33 चेंडूत 45 धावा फटकावल्या तर नितीश राणा (नाबाद 37), दिनेश कार्तिक (26) यांनीही अखेरीस फटकेबाजी करीत उपयुक्त योगदान दिले. शार्दुल ठाकुरने अचूक मारा करीत 13 षटकाअखेर केकेआरला 4 बाद 93 धावांवर रोखले होते. मात्र शेवटच्या सात षटकांत केकेआरने तब्बल 78 धावा फटकावल्याने त्यांना बऱयापैकी आव्हान उभा करता आले. अखेरच्या टप्प्यात त्यांनी चेन्नईच्या सॅम करणला टार्गेट केले. त्याच्या 4 षटकांत त्यांनी एकूण 56 धावा वसूल केल्या. जोश हॅझलवुडलाही अखेरच्या षटकात त्यांनी फटकावले. शुभमन गिल व वेंकटेश अय्यर यांच्यात धाव घेताना गोंधळ झाल्याने गिल (9) धावचीत झाला. तो लवकर बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठीने 4 चौकार, एका षटकारासह 45 धावा फटकावत अय्यरसमवेत बऱयापैकी पायाभरणी करताना 40 धावांची भागीदारी केली. अय्यरने (18) डाव उंचावण्याचा प्रयत्न केला. पण शार्दुलच्या गोलंदाजीवर धोनीकडे झेल देत तो बाद झाला. त्रिपाठीही झेलबाद झाला होता. पण पंचांनी तो नोबॉल दिल्याने तो बचावला होता. पुढच्याच चेंडूवर त्याने डीप एक्स्ट्राकव्हरच्या दिशेने षटकार मारला. कर्णधार इयॉन मॉर्गनही (8) लवकर बाद झाला. हॅझलवुडने त्याला डय़ु प्लेसिसकरवी झेलबाद केले. यावेळी केकेआरची स्थिती 3 बाद 70 अशी होती. 13 व्या षटकात त्रिपाठीही बाद झाला. जडेजाने त्याला त्रिफळाचीत केल्यावर त्यांची स्थिती 4 बाद 89 अशी झाली. 15 व्या षटकांत करणच्या गोलंदाजीवर रसेलने आक्रमक फटकेबाजी करीत 2 चौकार, 1 षटकार ठोकत 14 धावा वसूल केल्या. नंतर ठाकुरने त्याला त्रिफळाचीत करीत त्याची खेळी संपुष्टात आणली. राणा व दिनेश कार्तिक यांनी उर्वरित षटकांत फटकेबाजी करीत संघाला पावणेदोनशेच्या जवळ मजल मारून दिली. कार्तिकने 11 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह 26 तर राणानेही 3 चौकार, एक षटकारासह 27 चेंडूत नाबाद 37 धावा तडकावल्या. चेन्नईतर्फे हॅझलवुड व शार्दुल ठाकुर यांनी प्रत्येकी 2 तर जडेजाने एक बळी मिळविला.

चेन्नईच्या डावात गायकवाडने 28 चेंडूंच्या खेळीत 2 चौकार, 3 षटकार मारले तर डय़ु प्लेसिसने 30 चेंडूत 7 चौकारांसह 43 धावा फटकावल्या. मोईन अलीने 32 धावांसाठी 28 चेंडूत घेतले. त्यात 2 चौकार, एका षटकाराचा समावेश होता. अंबाती रायुडूने 9 चेंडूत 10, सुरेश रैनाने 7 चेंडूत 11 धावा काढल्या. केकेआरचा स्पिनर सुनील नरेन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 41 धावांत 3 बळी मिळविले तर प्रसिद्ध कृष्णा, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल यांनी एकेक बळी टिपले.

संक्षिप्त धावफलक ः कोलकाता नाईट रायडर्स 20 षटकांत 6 बाद 171 ः शुभमन गिल 5 चेंडूत 9, वेंकटेश अय्यर 15 चेंडूत 18, राहुल त्रिपाठी 33 चेंडूत 45, मॉर्गन 14 चेंडूत 8, नितीश राणा 27 चेंडूत नाबाद 37, रसेल 15 चेंडूत 20, दिनेश कार्तिक 11 चेंडूत 26, सुनील नरेन नाबाद 0, अवांतर 8. गोलंदाजाr ः हॅझलवुड 2-40, शार्दुल ठाकुर, 2-20, जडेजा 1-21.

चेन्नई सुपरकिंग्स 20 षटकांत 8 बाद 172 ः गायकवाड 28 चेंडूत 40, डय़ु प्लेसिस 30 चेंडूत 43, मोईन अली 28 चेंडूत 32, रायुडू 9 चेंडूत 10, रैना 7 चेंडूत 11, धोनी 4 चेंडूत 1, जडेजा 8 चेंडूत 22, सॅम करण 4 चेंडूत 4 शार्दुल नाबाद 3, दीपक चहर नाबाद 1, अवांतर 5. गोलंदाजी ः सुनील नरेन 3-41, कृष्णा 1-41, फर्ग्युसन 1-33, वरुण चक्रवर्ती 1-22, रसेल 1-28.

Related Stories

2022 विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी जर्मनी पात्र

Patil_p

दुसऱया कसोटीसाठी 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश

Patil_p

एफआयएच समिती सदस्यपदी श्रीजेश

Patil_p

गिल, पंत, राहुल यांना संधी मिळणार

Patil_p

प्रशिक्षक सिमॉन्स विलगीकरण कक्षात

Patil_p

राहुल द्रविड भारतीय क्रिकेट संघाचे नवे गुरुजी

Patil_p
error: Content is protected !!