तरुण भारत

ग्रामपंचायतीचे 54 कर्मचारी पालिकेकडे होणार वर्ग

यांचा प्रस्ताव पालिकेच्या नगरविकास विभागाकडे सादर

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

शाहूपुरी, विलासपूर तसेच इतर भाग हद्दवाढ झाल्याने सातारा नगर पालिकेच्या क्षेत्रात आले आहेत. यामुळे ग्रामपंचायतीचे काम करणारे सुमारे 54 कर्मचारी सातारा पालिकेकडे वर्ग होणार आहेत. यांचा प्रस्ताव पालिकेने नगर विकास विभागाकडे सादर केला आहे. या प्रस्तावानुसार दोन टप्प्यांत कर्मचाऱयांचे समायोजन होणार आहे.

      हद्दवाढीमुळे शाहूपुरी आणि विलासपूर या दोन ग्रामपंचायती बरखास्त झाल्या. व त्या ठिकाणचे अधिकारी, कर्मचारी हे पालिकेच्या सुचनेनुसार काम करू लागले. या ग्रामपंचायतीचे व इतर ठिकाणचे 54 कर्मचारी पालिकेच्या सुचनेनुसार हद्दवाढीतील नागरिकांना सेवा देत आहेत. त्यांच्यावर ग्रामविकास विभागाचे नियंत्रण आहे. या कर्मचाऱयांना ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकानुसारच सुविधा मिळत आहेत. आता या कर्मचाऱयांचे समायोजन करण्याच्या हलचाली नगरपालिकेने सूरू केल्या आहेत. या कर्मचाऱयांची सेवा, पद आणि इतर तांत्रिक बाबींची माहिती जमा करून त्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे. हा प्रस्ताव पालिकेने नुकताच नगरविकास विभागास सादर केला आहे. 

 या प्रस्तावानंतर समायोजन करण्याच्या प्रकियेला गती मिळणार आहे. यामुळे कर्मचारी वर्गातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. कर्मचाऱयांना पालिका कर्मचारी निवृत्तीनंतर रिक्तपदांचा आढावा घेत सेवेत दाखल करून घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीत कार्यरत असणाऱया कर्मचाऱयांना पहिल्यांदा पालिकेतील समायोजनात स्थान देण्यात येणार आहे.

Related Stories

श्री.छ.प्रतापसिंह उद्यान पूर्णत्वास नेणारच : खासदार उदयनराजे

Patil_p

कोकण कृषी विद्यापीठातर्फे प्रतीक सरकाळेला सुवर्णपदक

datta jadhav

सातारा जिल्ह्यातील शाळांमध्ये तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सुरु

triratna

खेड पिरवाडी परिसरातील 20 डंपरचा कचरा पालिकेने उचलला

Patil_p

खिंडवाडीतील खासगी सावकारास ठोकल्या बेडय़ा

Patil_p

परप्रांतीयाचा वेण्णा नदीत पडून मृत्यू

datta jadhav
error: Content is protected !!