तरुण भारत

संभाजीनगरमध्ये घरफोडी; 2 लाखाचे दागिने चोरीला

प्रतिनिधी/ सातारा

संभाजीनगरमधील श्री साई कॉलनीत राहत असलेले नवनाथ यदु केंजळे (वय 51) यांच्या घरी शुक्रवारी चोरटय़ांनी घरात प्रवेश करत 2 लाख 22 हजार रूपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेले. चोरीचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

Advertisements

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, नवनाथ केंजळे यांच्या घराच्या दरवाजाचे कोयंडा तोडून चोरटय़ानी शुक्रवारी 6.30 ते 9.20 च्या सुमारास आत प्रवेश केला. घरातील बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेले साडेचार तोळे सोन्याचे मनीमंगळसुत्र, कर्णफुले, एक ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठय़ा, लहान बाळाच्या सोन्याच्या अंगठय़ा, सोन्याचे बदाम, पायातील चांदीचे चार जोडव्याच्या जोडय़ा, दोन चांदीचे छल्ले, व इतर चांदीचे साहित्य असा 2 लाख 22 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या चोरीची अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एन. एस. कदम करत आहेत.

Related Stories

एकनाथ खडसेंना ईडीचा मोठा झटका; मनी लाँडरिंग प्रकरणात मालमत्ता केली जप्त

triratna

वाटल्यास, तुम्हाला भंडाऱ्यात बसवण्याची व्यवस्था करू; प्रविण दरेकरांनी साधला राऊतांवर निशाणा

triratna

भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील सोळा गावातील व्यापाऱ्यांची बैठक; ८ ते १२ दुकाने राहणार सुरू

triratna

सरकारी रक्तपेढी रक्तघटक मिळत नसल्याची तक्रार

Patil_p

दोन पथके रवाना तरी ‘बाळु’ सापडेना

Patil_p

राजमातांनी शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे स्ट्रप्चर उभारण्यासाठी चर्चा करुन केली पाहणी

Amit Kulkarni
error: Content is protected !!