तरुण भारत

जिह्यात कोरोनाचे 44 नवे रूग्ण

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिह्यामध्ये रविवारी कोरोनाचे 44 नवे रूग्ण मिळून आले आहेत़ तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर बरे झालेल्या 66 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े उपचारात असलेल्या एकूण रूग्णांची संख्या 703 इतकी असून केवळ 243 जणांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Advertisements

  रविवारी जिह्यात कोरोनाच्या 2 हजार 460 चाचण्या करण्यात आल्य़ा  यामध्ये आरटीपीसीआरच्या 677 चाचण्यांपैकी 18 तर ऍन्टीजेन टेस्टच्या 1 हजार 783  पैकी 26 जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळल़े यामध्ये मंडणगड-00, दापोली-5, खेड-3, गुहागर-6, चिपळूण-14, संगमेश्वर-2, रत्नागिरी-10, लांजा-2 तर राजापूर-2 असे तालुकानिहाय रूग्ण सापडले. जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 77 हजार 726 इतकी झाली आह़े  आरटीपीसीआर टेस्टचा विचार करता जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 2.66 इतका आह़े तर उपचारादरम्यान रत्नागिरी येथील 2 जणांचा मृत्यू  झाल्याची नोंद करण्यात आली आह़े तर मागील 24 तासात बरे झालेल्या 66 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े एकूण बरे झालेल्यांची संख्या 74 हजार 606 इतकी झाली आह़े बरे होण्याचे प्रमाण 95.99 इतके आह़े तर 703 रूग्ण उपचारात दाखल करण्यात आले आहेत़ यामध्ये केवळ 243 रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत़

Related Stories

रत्नागिरीतील प्रसिध्द कबड्डीपटू सुरज पाटील याचे कोरोनाने निधन

triratna

प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या अध्यक्षपदी दिलीप देवळेकर बिनविरोध

Patil_p

वेंगुर्ले राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे नवाबाग येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न

Ganeshprasad Gogate

रापण व्यवसायाला उतरती कळा

NIKHIL_N

शाळेचा गुणत्मक दर्जा टिकविल्याचा आनंद!

NIKHIL_N

रत्नागिरी : लांजाचे माजी गटविकास अधिकारी संतोष कठाळेंना अटक

triratna
error: Content is protected !!