तरुण भारत

रत्नागिरीत दुकाने फोडणाऱया दोघा संशयितांना अटक

मिनी ट्रकसह 6 लाखाचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी/ रत्नागिरी

Advertisements

मोठय़ा शिताफीने दुकाने फोडून लाखोंचा मुद्देमाल चोरून नेणाऱया दोघा संशयितांना  अटक करण्यात आल़ी त्यांच्याकडून मिनी ट्रकसह 6 लाख रूपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत करण्यात आला आह़े  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ही कारवाई करण्यात आल़ी शहरातील कुवारबाव व मारूती मंदिर परिसरात दुकाने फोडल्याची कबुली या संशयितांनी पोलिसांजवळ दिली.

अमित रवींद्र भोसले (22, ऱा खंडाळा रत्नागिरी) व प्रशांत प्रकाश वीर (19, ऱा कळझोंडी रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. रविवारी संशयितांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता 29 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आह़े या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 सप्टेंबर 2021 रोजी शहरातील मारूती मंदिर परिसरातील मोबाईल वर्ल्ड शॉपी फोडल्याची घटना समोर आली होत़ी  चोरटय़ांनी 12 मोबाईल हॅन्डसेट, एक ब्लू टूथ इअर फोन व 16 हजार रूपयांची रोकड असा 1 लाख 75 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला होत़ा

तसेच 6 सप्टेंबर 2021 रोजी रात्रीच्या सुमारास रेल्वेस्टेशन येथील दुर्गा टायर व दर्पण फोटोचे दुकान फोडल्याचे समोर आले होत़े यावेळी चोरटय़ांनी दोन्ही दुकानातील 6 टायर व फोटो स्टुडिओतील पॅमेरा असा 15 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला होत़ा या दोन्ही चोरींच्या घटनांची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होत़ी  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडूनही चोरींच्या घटनेचा तपास करण्यात येत होत़ा

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, खंडाळा येथून अमित भोसले व प्रशांत वीर या दोघांनाही ताब्यात घेण्यात आल़े त्यांच्याकडे पोलिसांच्या खास शैलीत चौकशी केली असता दोन्ही चोरीच्या घटनांचा उलगडा झाल़ा दोघांकडून चोरीला गेलेला मुद्देमाल तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेला मिनी ट्रक ताब्यात घेण्यात आला आह़े

 ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार शांताराम झोरे, प्रशांत बोरकर, नितीन डोमणे, अरूण चाळके, पोलीस नाईक रमीज शेख, पोलीस शिपाई अतुल कांबळे यांनी केल़ी तसेच चाफे गावचे पोलीस पाटील हिराजी तांबे यांनी तपासामध्ये मोलाचे सहकार्य केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Related Stories

पेशंट भुदरगडला, टेन्शन सावंतवाडीत

NIKHIL_N

सरकारी वाहनांचा दुरुपयोग कोण रोखणार?

NIKHIL_N

महिलेला पावणे नऊ लाखाचा गंडा

Patil_p

समविचारी मंच ने वेधले जिल्हय़ातील विविध समस्यांकडे लक्ष

Patil_p

रत्नागिरी : कोकणात मच्छिमारांसह शेतकऱ्यांची चळवळ उभारणार

triratna

रत्नागिरीत जिल्ह्यात, ६२ कोरोनामुक्त,३८ नवे रुग्ण

triratna
error: Content is protected !!