तरुण भारत

सॅफ फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात पाच गोमंतकीय फुटबॉलपटू

क्रीडा प्रतिनिधी /मडगाव

मालदीवमध्ये आगामी सॅफ फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेणारा 23 सदस्यीय भारतीय फुटबॉल संघ संघाचे प्रमुख प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी जाहीर केला आहे. भारतीय संघात गोव्याच्या ब्रँडन फर्नांडिस, सॅरिटॉन फर्नांडिस, लिस्टन कुलासो, मंदार राव देसाई आणि ग्लॅन मार्टिंन्स या पाच फुटबॉलपटूंचा समावेश आहे. स्पर्धेचे आयोजन 1 ऑक्टोबरपासून सुरू होईल.

Advertisements

स्पर्धेत भारत, बांगलादेश, नेपाळ, मालदीव आणि श्रीलंका या देशांचा समावेश असून अंतिम लढत 16 ऑक्टोबर रोजी होणार आहे. लीग सामन्यांतून प्रथम स्थान मिळविणारे दोन संघ अंतिम लढतीसाठी पात्र ठरतील. आज सोमवारी सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ बेंगलोरला येणार असून तिथून थेट मालदीवला रवाना होतील. 4 ऑक्टोबरला बांगलादेशविरूद्धच्या लढतीने भारतीय फुटबॉल संघ  स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरूवात करेल.

भारताने सॅफ फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद सातवेळा मिळविले आहे. 1993 (लाहोर), 1997 (काठमांडू), 1999 (मडगाव), 2005 (कराची), 2009 (ढाका), 2011 (नवी दिल्ली) आणि 2015-16 (थिरुवनंतपुरम) झालेल्या सॅफ फुटबॉल स्पर्धेत भारत विजेता ठरला होता.  भारताचे लीग सामने याप्रमाणेः 4 ऑक्टोबर वि. बांगलादेश, 7 ऑक्टोबर वि. श्रीलंका, 10 ऑक्टोबर वि. नेपाळ, 13 ऑक्टोबर लि. मालदीव.

भारतीय फुटबॉल संघ याप्रमाणे : गोलरक्षक- गुरप्रीत सिंग, अमरिंदर सिंग, विशाल कैथ. बचावरक्षक- प्रीतम कोटाल, सॅरिटॉन फर्नांडिस, चिंगलेनसाना सिंग, राहुल भेके, सुभाषिश बोस, मंदार राव देसाई. मध्यफळी- उदांता सिंग, ब्रँडन फर्नांडिस, लालेंगमाविया, अनिरुद्ध थापा, सहाल अब्दुल समद, जिक्सन सिंग, ग्लॅन मार्टिंन्स, सुरेश सिंग, लिस्टन कुलासो व यासिर मोहम्मद. आघाडीफळी- मानवीर सिंग, रहिम अली. सुनील छेत्री व फारुख चौधरी.

Related Stories

डिचोलीत लॉकडाउनचा फिरत्या विपेत्यांकडून फज्जा.

Omkar B

जीम, क्रीडा, धार्मिक स्थळांना अल्प ढिलाई

Amit Kulkarni

लाखेरे डिचोलीत आयआयटी प्रकल्प आणावा

Patil_p

विजेच्या धक्क्याने केरी सत्तरीतील पंचायत शिपाईचा मृत्यू

Amit Kulkarni

ख्रिस्ती बांधवांच्या पवित्र सप्ताहात विधानसभेचे अधिवेशन घेणे धक्कादायक

Amit Kulkarni

केरळमधून येणाऱयांवर निर्बंध लादा

Amit Kulkarni
error: Content is protected !!