तरुण भारत

वनौषधी प्रकल्पातून जागतिक ओळख

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना विश्वास : आडाळीत प्रकल्पस्थळी पाहणी

प्रतिनिधी /दोडामार्ग

Advertisements

आडाळी एमआयडीसीला रविवारी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय वनौषधी संस्थेला देण्यात आलेल्या जागेची पाहणी केली. या प्रकल्पातून शेकडो जणांना रोजगार मिळेल. येथील जैवविविधतेला जागतिक ओळख मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नाईक केंद्रीय आयुषमंत्री असताना त्यांनी राज्यासाठी एकमेव असलेला राष्ट्रीय वनौषधी प्रकल्प मंजूर केला. सुरुवातीला हा प्रकल्प जळगाव व नंतर लातूर येथे हलविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, जिल्हय़ातील शिवसेना व भाजपच्या नेत्यांनी समन्वय साधून अखेर जिल्हय़ात प्रकल्प आणला. गेल्या जूनमध्ये राज्य शासनाने आडाळी एमआयडीसीतील 50 एकर जागा या प्रकल्पासाठी दिली. महामंडळाने तातडीने या जागेचे हस्तांतरण केले.

रविवारी नाईक यांनी या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी जागेबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, गेली पाच वर्षे या प्रकल्पासाठी मी प्रयत्न करत होतो. गोवा आणि महाराष्ट्रासाठी एकमेव प्रकल्प आहे. राज्य शासनाने तातडीने पावले उचलून आडाळी येथील ही योग्य जागा प्रकल्पाला दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या प्रकल्पातून स्थानिकांना चांगला रोजगार मिळेल. जिल्हय़ातील वनौषधी या ठिकाणी गोळा केल्या जातील. त्यावर संशोधन केले जाईल. जागतिक बाजारपेठेत त्याची निर्यात होईल. यातून शेकडो स्थानिकांना रोजगार मिळेल. त्यामुळे दरडोई उत्पन्न चौपट होईल. जागा आयुष मंत्रालयाच्या ताब्यात आल्यावर लगेच कामाला सुरुवात करण्यात येईल. येथील परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे. त्याचे रुपांतर यापुढे रोजगारात होईल.

यावेळी ग्रामस्थांच्यावतीने नाईक यांचा एकनाथ नाडकर्णी, राजन म्हापसेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांच्यासह सुधीर दळवी, प्रवीण गावकर, प्रदीप गावकर, संजय विर्नोडकर, ग्रामपंचायत सदस्य पराग गावकर, सुरेंद्र सावंत, संतोष हडीकर, ग्रामस्थ शंकर गावकर, गोविंद परब, एम. एम. गावकर, भगवान गावकर, दत्ताराम गावकर, भिवा गावकर, बुथ अध्यक्ष शैलेश गावकर, जयराम गावकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

दारूसाठी पैसे न दिल्याने पतीकडून पत्नीचा खून

Amit Kulkarni

महावीर अभयाण्यात चार जलसंवर्धन प्रकल्प

Omkar B

सरकारचे संवेदनशील विषयांकडे दुर्लक्ष

Patil_p

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक श्यामसुंदर रमाकांत नायक यांचे निधन

Amit Kulkarni

कदंबच्या मोबाईल तिकीट पद्धतीचा शुभारंभ

Amit Kulkarni

पणजीतील दुसऱया टप्प्यातील पे पार्किंगसाठी सप्टेंबरमध्ये निविदा

Patil_p
error: Content is protected !!