तरुण भारत

खासदार निधी विकासकामांत देशभरात गोव्याचा 10 वा क्रमांक

श्रीपाद नाईक यांची माहिती

प्रतिनिधी /म्हापसा

Advertisements

खासदार निधीच्या माध्यमातून प्रत्येक गावागावात आपण कामे केली आहे. चौथ्या खासदारकीच्या काळात आपण एक हजार प्रकल्प पूर्णत्वाकडे नेले. आतापर्यंत आपण 350 कोटीहून अधिक रुपयांची कामे केली असून 800 खासदारापैकी विकास कामाच्या बाबतीत राज्याचा क्रमांक दहावा आला आहे, अशी माहितीही श्रीपाद नाईक यांनी दिली.

आपण पक्षाचा शिस्तबद्ध सोलजर आहे. पक्ष काय ठरवितो वा काय सांगतो त्या आदेशाप्रमाणे आम्ही पुढे जातो. जी जबाबदारी पक्षाने दिली ती योग्य प्रकारे पार पाडतो. आजवर जी जबाबदारी दिली ती योग्यरित्या पार पाडण्याचे आमचे कार्य आहे. आपण रिंगणात अतरावे की नाही हे मी सांगणे योग्य ठरणार नाही ती जनता ठरविते, असेही केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले.

युती झाल्यास आघाडी मिळणार

सर्वपक्षाना भाजपबरोबर रहावे असे वाटते. आपल्यासही वाटते युती व्हायला पाहिजे. असे झाल्यास 101 टक्के मॅजोरीटी मिळणारच. आमचाही तसा विचार आहे अन्यथा कोणत्याही परिस्थितीत भाजप आघाडी मिळविणारच अशी माहितीही नाईक यांनी दिली. नव्या दमाचे उमेदवार पुढे यायला पाहिजे असे सांगून श्रीपाद नाईक म्हणाले की, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत येत्या निवडणुकीत सक्षम मुख्यमंत्री आहेत की नाही हा प्रश्न जरा गंभीर आहे. आपण त्याबाबत काही बोलू शकत नाही. पक्षाचा जो निवडणूक बोर्ड आहे तो याबाबत निर्णय घेतो. उमेदवार कोण असेल हा निर्णयही मंडळ घेतो, असे ते म्हणाले.

राजकीय धूसफूसचा परिणाम पक्षावर होईल काय असे श्रीपाद नाईक यांना विचारले असता ते म्हणाले, भाजप पक्षाला काही अडचण होणार नाही. भाजप कित्येक वर्ष राजकारणात आहे. जनतेसाठी काय पाहिजे ते भाजप आजवर करीत आला आहे. आपल्यास पूर्ण विश्वास आहे यावेळी जनता भाजपचेच सरकार निवडून देणार आहे.

महागाई विषय आहे हा कधी कमी जास्त होतोच. आज कित्येक सरकार आले मात्र हा प्रश्न नेहमीच असतो. ती कशी आटोक्यात आणता येईल याकडे भाजप लक्ष देणार आहे. पेट्रोल दर वाढले आहे त्यास सरकार काहीच करू शकत नाही. सरकार इतकेच करू शकते की त्यातील काही कर कमी करू शकते. महागाई वाढली की ती वाढली म्हणून बातम्या येतात मात्र कमी झाले त्याच्या बातम्या ठळकपणे येत नाही. असा आरोपही श्रीपाद नाईक यांनी केला.

केजरीवाल दिल्लीला फसवून आता गोव्याला फसवायला आले-

दिल्लीचे मुख्यमंत्री श्री. केजरीवाल गोव्यात आले त्यांनी विविध घोषणा केल्या. ते दिल्लीच्या जनतेला फसवून आता गोव्याच्या जनतेला फसवायला आलेले आहेत. जनता त्यांना ओळखून आहे. जनता योग्यवेळी योग्य निर्णय घेणार असून त्यांच्या आश्वासनांना बळी पडणार नाही. आश्वासन देऊन जनतेला ओढून घेणे त्यांचे काम आहे, अशी माहिती यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.

Related Stories

वेतन थकबाकीसाठी मुरगाव पालिका कामगारांचे तासभर काम बंद

Patil_p

मडगावातील घाऊक मासळी बाजार बंद

Omkar B

ब्रम्हकरमळीतील नागरिकांना जुलाब, उलटय़ा

Amit Kulkarni

गोव्यात कोरोनाबाधित नवीन रुग्णाची भर

Patil_p

काँग्रेसने बाबुश कुयेलोच्या मुलाला उमेदवारी द्यावी : बोर्गेस रिबेलो

Omkar B

गव्यारेडय़ाच्या धडकेने दुचाकीचालक युवक जखमी

Patil_p
error: Content is protected !!