तरुण भारत

साटरे डोंगराळ भागातून गढूळ पाण्याचा प्रवाह

कोसळलेल्या डोंगराबाबत अभ्यास करण्याची घोषणा हवेत

उदय सावंत/साटरे

Advertisements

 सत्तरी तालुक्मयातील साटरे गावात डोंगर कोसळल्यानंतर अजूनही पावसाचे गढूळ पाणी गावांमध्ये येत आहे. यामुळे गावातील नागरिकांनी भीती व्यक्त केली असून सरकारने ताबडतोब उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. अन्यथा पुन्हा गावावर संकट येण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही.

 जुलै महिन्यामध्ये साटरे गावाच्या डोंगराळ भागांमध्ये प्रचंड पर्जन्यवृष्टी झाली. यामुळे गावापासून अवघ्या अंतरावर असलेला जवळपास तीन किलोमीटर अंतराचा डोंगर कोसळला व प्रचंड प्रमाणात जंगल संपत्तीची हानी झाली होती. त्यावेळी नागरिकांनी सरकारकडे विनवणी करताना यावर गांभिर्याने अभ्यास करून उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी  अभ्यास करून उपाययोजना करण्यासंदर्भात लक्ष देण्याचे आश्वासन दिले होते मात्र अजून पर्यंत उपाययोजना करण्यात आलेली नाही.

जवळपास 3 कि.मी अंतराचा डोंगर कोसळला.

जुलै महिन्यामध्ये जवळपास तीन किलोमीटर अंतराचा डोंगर कोसळला. गोव्याच्या इतिहासात असा प्रचंड प्रमाणात डोंगर कोसळण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. यामुळे जंगल संपत्ती तसेच जैविक संपत्तीला मोठय़ा प्रमाणात हादरा बसला. प्रचंड मातीचा ढिगारा खाली येऊन तो सपाट जमिनीवर पसरला होता. दरम्यान या  गावांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे कारण पावसाळी मौसमात सदर डोंगराच्या कपारीतून गढूळ पाणी येत आहे. यामुळे अजूनही सदर ठिकाणी दलदल असल्याचे स्पष्ट झालेले आहे. यदाकदाचित मोठा पाऊस लागल्यास पाण्याच्या प्रवाहाबरोबर मातीचा थर खाली येण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केलेली आहे.

डोंगर जाळण्याच्या तक्रारी मात्र कारवाई नाही

अधिक माहितीनुसार, सदर डोंगर माथ्यावर अनेकवेळा डोंगर जाळण्याचे प्रकार घडू लागले होते. यामुळे डोंगराची माती शोषन करणारी प्रक्रिया कमकुवत ठरली व प्रचंड प्रमाण लागलेल्या पावसाच्या माध्यमातून दलदल निर्माण झाली व यातून डोंगर कोसळण्याचा प्रकार घडला.

 दरम्यान डोंगर जाळण्याच्या अनेक तक्रारी गोवा सरकारला सादर केल्या होत्या. मात्र त्यावर कारवाई अजून पर्यंत झालेली नाही. यामुळेच असे संकट निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

गढूळ पाणी अजूनही वाहते.

ग्रामस्थांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार सदर भागांमध्ये पाऊस पडल्यास पावसाचे पाणी गढूळ स्वरूपात खाली येते. यामुळे अजूनही सदर ठिकाणी दलदल असल्याचे सिद्ध झालेले आहे. यदाकदाचित पुन्हा एकदा पावसाने आक्रमक रूप धारण केल्यास यादलदलीची माती पाण्याच्या प्रवाहाबरोबर खालच्या भागामध्ये येण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. तसे झाल्यास गावासमोर संकट निर्माण होण्याची शक्मयता ग्रामस्था?नी वर्तविली आहे.

Related Stories

गोवा राज्यात प्रवेशासाठी मार्ग खुले – मुखमंत्री प्रमोद सावंत

triratna

रविवारी पणजीत 7 नवे कोरोना रुग्ण

Omkar B

स्टेट-गोवा प्रकल्पांतर्गत आरोग्य सेवा संचालनालयाने हेल्थवे हॉस्पिटलशी भागीदारी करण्यासाठी सामंजस्य करार

Patil_p

कोरोना : 11 बळी, 303 नवे बाधित

Amit Kulkarni

वेळसावचा पहिला विजय; पणजी पराभूत

Amit Kulkarni

राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची जागृती फिरत्या वाहनावरून थेट दारात

Amit Kulkarni
error: Content is protected !!