तरुण भारत

आजपासून विद्यार्थ्यांचा प्रवास तिकीटवर

जुन्या बसपासची मुदत संपली, नवीन बसपास मिळविण्याकडे दुर्लक्ष

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

परिवहन मंडळाकडून दरवषी विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात बसपास वितरित केला जातो. गतवषी वितरित करण्यात आलेल्या बसपासची मुदत 31 ऑगस्ट रोजी संपली आहे. दरम्यान परिवहनने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आतापर्यंत दोन वेळा जुन्या बसपासची मुदत वाढविली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास करणे सोयीस्कर झाले. मात्र 26 सप्टेंबरपासून विद्यार्थ्यांना जुना बसपास दाखवून प्रवास करता येणार नाही, अशी माहिती परिवहनने दिली आहे.

परिवहनने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जुन्या पासची मुदत 25 सप्टेंबरपर्यंत वाढवून दिली होती. मात्र आता जुन्या पासची मुदत संपल्याने विद्यार्थ्यांना सोमवारपासून तिकीट काढून प्रवास करावा लागणार आहे. गतवषीपासून बसपाससाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली आहे. ही प्रक्रिया थोडी किचकट व वेळखाऊ असल्याने विद्यार्थी बसपास काढण्यासाठी निरुत्साही असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत केवळ 680 विद्यार्थ्यांनीच बसपाससाठी अर्ज केले आहेत.

31 ऑगस्ट रोजी गतवषीच्या बसपासची मुदत संपल्यानंतर परिवहनने विद्यार्थ्यांच्या सोयीखातर दोन वेळा जुन्या बसपासची मुदत वाढवून दिली होती. मात्र या काळात विद्यार्थ्यांनी नवीन बसपास काढण्याकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र आता सोमवारपासून विद्यार्थ्यांना बसपास प्रवासात मुभा दिली जाणार नसून प्रवासासाठी तिकीट काढावे लागणार असल्याची माहितीही परिवहनने दिली आहे.

काही विद्यार्थ्यांच्या बसपासचे नूतनीकरण

बीएड्, पदवी आणि डिप्लोमा विद्यार्थ्यांनी गतवषी बसपास मिळविले आहेत. मात्र काही कारणास्तव या विद्यार्थ्यांच्या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी बीएड्, पदवी आणि डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना दोन महिन्यांसाठी बसपासचे नूतनीकरण करून मिळणार आहे.

इतरांसाठी अनिवार्य

परिवहनने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी 26 सप्टेंबरपर्यंत दिलेली जुन्या बसपासची मुदत संपली आहे. त्यामुळे पुढील प्रवास करण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना नवीन बसपास काढणे बंधनकारक आहे.

Related Stories

आरटीपीसीआरची सक्ती नागरिकांसाठी तापदायक

Patil_p

शेतकऱयांचे प्रादेशिक आयुक्तांना निवेदन

Amit Kulkarni

लाल-पिवळय़ाबाबत कायद्याच्या चौकटीत निर्णय

Patil_p

कॅन्टोन्मेंटचे कामकाजही आता ऑनलाईन

Patil_p

जनतेला आरोग्य सेवा देण्यावर भर द्या !

Amit Kulkarni

रविवारी मांसाहाराला अधिक पसंती

Patil_p
error: Content is protected !!