तरुण भारत

चीनकडून LAC वर 50 हजार अतिरिक्त सैनिक, शस्त्रास्त्रे तैनात

ऑनलाईन टीम / लेह :

पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेजवळ चिनी सैन्याच्या हलचाली पुन्हा वाढल्या आहेत. चीनने सीमेजवळ 50 हजार अतिरिक्त सैन्य आणि शस्त्रास्त्रे तैनात केली आहेत. दौलत बेग ओल्डी सेक्टर, गोगरा हाईट्स आणि या भागातील अन्य ठिकाणी चिनी सैन्याकडून ड्रोन उडविले जात आहेत.

Advertisements

चिनी सैन्याकडून सीमेजवळ लढाऊ विमानांसाठी तळ तयार करण्यात येत असून, तळांवर शस्त्रास्त्रे तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे एलएसीवर भारतीय ड्रोन तैनात करण्यासाठी संरक्षण दलांना परवानगी देण्यात आली असून, भारतीय जवान चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, भारत आणि चीनमध्ये 3488 किलोमीटर लांबीच्या एलएसीवरुन वाद आहे. अरूणाचल प्रदेश हा तिबेटचा भाग असल्याचा चीन दावा करत आहे. परंतु, चीन भारताच्या एक इंच हद्दीवरही अतिक्रमण करू शकत नाही, असे भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे.

Related Stories

कोरोना संकटात अमेरिका भारतासोबत

Patil_p

दिल्लीत 150 नवे कोरोना रुग्ण; 1,208 ॲक्टिव्ह रुग्ण

Rohan_P

राम मंदिराच्या पाया खोदाईचे काम सुरू

Patil_p

मिग 21 कोसळले, पायलटचा मृत्यू

Patil_p

400 वर्षे जुनी देवीची मूर्ती चोरीस

Patil_p

हवेतून कोरोना विषाणूचा संसर्ग; 32 देशांच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली भीती

datta jadhav
error: Content is protected !!