तरुण भारत

सारस्वत बँक निवडणुकीत गौतम ठाकुर पॅनेलचा दणदणीत विजय

बेळगाव / प्रतिनिधी

भारतातील सर्वात मोठी शहरी सहकारी बँक असणाऱया सारस्वत बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत गौतम ठाकुर यांच्या एकता पॅनेलने प्रचंड विजय मिळविला आहे. या पॅनेलला 92 टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. त्यामुळे आता हे पॅनेल 2021-2026 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी बँकेचे व्यवस्थापन सांभाळणार आहे. सारस्वत बँकेचा व्यवसाय 67 हजार कोटींहून अधिक आहे.

Advertisements

या निवडणुकीसाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश आणि दिल्ली इत्यादी राज्यांमधील 154 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले होते. एकता पॅनेलच्या एकमेव प्रतिस्पर्धी पॅनेलची अनामत रक्कमही जप्त झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गौतम ठाकुर यांनी या विजयाचे श्रेय भागधारकांच्या विश्वासाला दिले आहे. बँकेने कोरोनाच्या अत्यंत आव्हानात्मक काळातही आपल्या उत्कृष्ट कामगिरीत सातत्य राखले आहे, असे सांगण्यात आले. उर्वरित महाराष्ट्रासाठी असलेल्या जागांमधून गोवा विभागातून ए. जी. आंबेसकर तर बेंगळूर विभागातून एन. जी. पै हे विजयी झाले आहेत.

Related Stories

कुद्रेमनीत ऊस मळय़ाला आग सव्वाचार लाखांचे नुकसान

Patil_p

क्लिनिकल बायोमार्कर सेंटरचे केएलईमध्ये आज उद्घाटन

Amit Kulkarni

कारिटस इंडिया, बेळगाव डायोसीसतर्फे बिम्सला 25 ऑक्सिजन कॉन्सन्टेटर

Amit Kulkarni

आनंद चॅलेंजर्सचा 6 गडय़ांनी विजय

Patil_p

मनपा अधिक्षक आभियंत्यापदी लक्ष्मी निप्पाणीकरांना बढती

Patil_p

वनखात्याच्या समोरील रस्त्यावर वाहतूक कोंडी

Amit Kulkarni
error: Content is protected !!