तरुण भारत

सोलापूर : दक्षिणमध्ये सीना नदीला पूर

वडकबाळ, राजूर, सिंदखेड, संजवाड पुलापर्यंत पाणी ः नागरिकांना सतर्कतेचा इशारा

दक्षिण सोलापूर / प्रतिनिधी

Advertisements

दक्षिण सोलापूर तालुक्मयातील सीना नदीला पूर आल्याने वडकबाळ, सिंदखेड, राजूर व संजवाड येथील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून, नदीकाठच्या शेतात पाणी शिरले आहे. या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून उजनी धरण क्षेत्रासह सीना नदीच्या उगम क्षेत्रात मोठÎा प्रमाणात अतिवृष्टी होत असल्याने नदीला पूर आला आहे. पाण्याचा विसर्ग वाढल्याने सीना नदी दुथडी भरून वाहत आहे. शनिवारी रात्री दक्षिण सोलापूर तालुक्मयातील वडकबाळ, सिंदखेड, राजूर येथील बंधारे पाण्याखाली गेले. औराद- संजवाड रस्त्यावरील पुलाजवळ पाणी वाहू लागले. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येत आहे. सीना काठच्या अनेक शेतकऱयांच्या शेतात पाणी पसरले आहे. सीना नदी काठावरील गावातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

यानंतर दक्षिण सोलापूरच्या सीना नदीकाठच्या पूरस्थिती असलेल्या भागात प्रशासनाकडून सीना नदीकाठच्या वांगी, वडकबाळ, औराद, बोळकवठा, हत्तरसंग व कुडल या गावांना भेटी देऊन पाहणी केली. नदीकाठच्या लोकांना सुरक्षितस्थळी जावे. शेतकरी महिला व मुलांना पाण्यात न जाण्याचे आवाहन केले. तसेच महसूल व पोलीस अधिकाऱयांना सतर्क राहण्यास सांगितले.

सलग दोन-तीन दिवसांपासून पाऊस होत आहे. खरीप पिकांना जीवदान मिळत आहे. सध्या तालुक्मयातील सर्वच भागात ढगाळ वातावरण आहे. काही भागात अधून मधून पावसाने हजेरी लावली. कमी-अधिक प्रमाणात काल आणि आज पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकऱयांमधून समाधान व्यक्त होत आहे.

कासेगावचा  संपर्क तुटला

शनिवारी रात्री तसेच मागील तीन-चार दिवसांत होणाऱया पावसामुळे दक्षिण सोलापूर तालुक्मयातील कासेगावला जाणारे सर्व मार्ग मुसळधार पावसामुळे बंद झाले आहेत. उळे गावातून येणारा रस्ता ओढÎाला पूर आल्याने बंद झाला आहे. उळेवाडी, वडजी, सोलापूर, तुळजापूर महामार्गतून येणारा रस्ता सुद्धा ओढÎाला पाणी आल्याने बंद झाला आहे. त्यामुळे सर्व बाजूंनी कासेगावचा संपर्क तुटल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अनेक विहिरी तुडुंब भरून वाहत आहेत तसेच ज्वारी पेरणीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मुसळधार पावसामुळे शेतकरी राजा सुखावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Related Stories

सोलापूर : युवा चित्रकार विपुलने साकारली रोहित शर्माची पोर्ट्रेट रांगोळी

triratna

माढा तालुक्यातील कुर्डूत बालविवाह रोखला

triratna

पदवी प्रमाणपत्रासाठी १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा

triratna

सोलापूर : किणीमोड येथील दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा

triratna

दिघंचीच्या युवकाचा सोलापूरमध्ये अपघाती मृत्यू

triratna

करमाळा येथे हमीभाव खरेदी केंद्रास मंजुरी

triratna
error: Content is protected !!